Hair Care : केस गळती थांबवण्यासाठी उपाय, तेलांबरोबरच पौष्टिक आहाराकडेही लक्ष देणं महत्त्वाचं
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केसांच्या समस्या टाळण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. केसांना तेल लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करा. केसांवर जास्त काळ तेल ठेवल्यानं केस खराब होऊ शकतात. केसांना तेल लावणं चुकीचं नाही, पण ते चुकीच्या पद्धतीने लावणं चुकीचं आहे. जास्त तेल लावल्यानं आणि रात्रभर तेल तसंच राहिल्यानं छिद्रं बंद होऊ शकतात आणि केसांची वाढ खुंटू शकते.
मुंबई : बदलत्या ऋतूनुसार केसांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. केसांची काळजी नीट घेतली नाही तर केस गळू शकतात. शिवाय, केस कोरडे होतात आणि केसांची योग्य वाढ होत नाही.
केसांसोबतच, डोक्याची त्वचा म्हणजेच टाळू निरोगी ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. टाळू स्वच्छ असेल तरच डोक्यातला कोंडा, खाज सुटणं आणि जास्त तेलकटपणा यासारख्या समस्या कमी होतील.
केसांच्या समस्या टाळण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. केसांना तेल लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करा. केसांवर जास्त काळ तेल ठेवल्यानं केस खराब होऊ शकतात. केसांना तेल लावणं चुकीचं नाही, पण ते चुकीच्या पद्धतीने लावणं चुकीचं आहे. जास्त तेल लावल्यानं आणि रात्रभर तेल तसंच राहिल्यानं छिद्रं बंद होऊ शकतात आणि केसांची वाढ खुंटू शकते.
advertisement
केसांच्या समस्येनुसार तेलाची निवड -
कोरड्या केसांसाठी, नारळ किंवा बदाम तेल वापरा. केस जास्त गळत असतील तर एरंडेल तेल आणि हिवाळ्यात मोहरीचं तेल वापरा. पाच ते दहा मिनिटं हलक्या हातानं मालिश करा आणि काही तासांनी केस धुवा.
आहाराकडे लक्ष द्या -
advertisement
महागडे शाम्पू वापरले पण जर योग्य आहार घेतला नाही तर केस मोठ्या प्रमाणात गळतील. म्हणून, आहार पौष्टिक असणं गरजेचं आहे. डाळी, अंडी, दही, चीज आणि काजू सारखे पदार्थ आहारात ठेवा.
केस गळतीची मुख्य कारणं म्हणजे लोह आणि व्हिटॅमिन डीची कमतरता, त्यानुसार आहार घेणं केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यावश्यक आहे. हंगामी फळं, हिरव्या भाज्या खाणं आणि पुरेसं पाणी पिणं यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 12:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : केस गळती थांबवण्यासाठी उपाय, तेलांबरोबरच पौष्टिक आहाराकडेही लक्ष देणं महत्त्वाचं