जेन-झी Post Office म्हणजे काय? मुंबईतील पहिल्या 'या' पोस्ट ऑफिसमध्ये काय मिळणार सुविधा?
Last Updated:
Gen-Z Post Office Mumbai: मुंबईतील पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस आता विद्यार्थ्यांच्या सेवेत सुरु होणार आहे. या नवीन केंद्रात डिजिटल बँकिंग, ई-कॉमर्स पार्सल सुविधा आणि खास विद्यार्थ्यांसाठी योजना उपलब्ध आहेत.
मुंबई : भारतीय टपाल विभाग मुंबईतील पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस आयआयटी मुंबई येथे सुरू करणार आहे. या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन आज होणार आहे. हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा असून तरुण पिढीशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडण्याचा कारण यामागे आहे.
मुंबईत पहिलं जेन-झी पोस्ट ऑफिस
जेन-झी पोस्ट ऑफिस हे खास करुन विद्यार्थी, तरुण आणि डिजिटल युगातील नागरिकांसाठी तयार करण्यात आले आहे. येथे पारंपरिक टपाल सेवांसोबतच आधुनिक आणि डिजिटल सुविधांचा अनुभव मिळणार आहे. याआधी दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये अशा प्रकारची जेन-झी पोस्ट ऑफिस सुरू झाली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचनंतर आता मुंबईत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
advertisement
या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह आणि मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालक केया अरोरा यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी आयआयटी मुंबईचे कुलसचिव, टपाल विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि आयआयटी मुंबईतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
काय मिळणार सुविधा...?
या जेन-झी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक खास सुविधा देण्यात येणार आहेत. येथे मोफत वायफाय, कॅफेटेरिया-शैलीतील बैठक व्यवस्था तसेच एक छोटे वाचनालय असणार आहे. तरुणांसाठी स्वतंत्र संगीत रुमही असेल. निवडक टपाल तिकीट संग्रह आणि त्यासंबंधित वस्तू येथे पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. नागरिकांमध्ये टपाल सेवांबद्दल माहिती देण्यासाठी पार्सल ज्ञान पोस्ट ही संकल्पना राबवली जाणार आहे.
advertisement
सर्व सेवा पूर्णपणे डिजिटल आणि क्यूआर कोडवर आधारित असतील. येथे आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा तसेच टपाल कार्यालय बचत बँक योजनांबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. स्पीड पोस्ट सेवांवर 10 टक्के सवलत तर मोठ्या प्रमाणात पार्सल पाठवणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के सवलत दिली जाणार आहे. हा उपक्रम तरुणांसाठी टपाल सेवेचा अनुभव अधिक सोपा, आधुनिक आणि आकर्षक बनवणार आहे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 12:06 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
जेन-झी Post Office म्हणजे काय? मुंबईतील पहिल्या 'या' पोस्ट ऑफिसमध्ये काय मिळणार सुविधा?







