Astrology 2026: नव्या वर्षात शनिची साडेसाती, 3 राशीवाले चुका महागात पडणार, कोणती सावधगिरी बाळगाल?

Last Updated:

Astrology 2026: नव्या वर्षात काही राशींना शनिचा त्रास वाढणार असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत ज्योतिषाचार्य आदित्य जोशी गुरुजी यांनी माहिती दिली आहे.

+
Astrology

Astrology 2026: नव्या वर्षात शनिची साडेसाती, 3 राशीवाले चुका महागात पडणार, काय कराल?

मुंबई : नव्या वर्षाला अवघे पंधरा दिवस उरले असून 2026 हे वर्ष सुरू होण्याच्या तयारीत आहे. दरवेळी नववर्ष जवळ आले की राशीभविष्य, शनीचा प्रभाव, साडेसाती आणि संभाव्य अडचणी याबाबत चर्चा सुरू होते. यंदाही 2026 मध्ये शनीचा त्रास वाढणार, काही राशींना कठीण काळ जाणार, अशा अनेक चर्चा ऐकू येत आहेत. मात्र या सर्व चर्चांमागचे वास्तव काय आहे, याबाबत ज्योतिषाचार्य आदित्य जोशी गुरुजी यांनी लोकल18 च्या माध्यमातून माहिती दिली आहे.
आदित्य जोशी गुरुजी यांच्या मते, 2026 हे वर्ष भीती निर्माण करणारे नसून समजून घेतले तर संतुलित आणि मार्गदर्शक ठरणारे आहे. शनी ग्रह सध्या कुंभ, मीन आणि मेष या राशींमध्ये असून तो 2 जून 2027 पर्यंत याच राशींमध्ये भ्रमण करणार आहे. त्यामुळे येत्या 2026 या नववर्षात शनीमुळे मोठे संकट ओढवेल, असा समज चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
दाते पंचांगानुसार 2026 मध्ये शनीचा प्रभाव राशींवर टप्प्याटप्प्याने जाणवणार आहे. यामध्ये मीन राशीवर शनीचा प्रभाव पहिल्या क्रमांकावर राहणार असून त्यानंतर कुंभ, मकर, धनु, वृश्चिक, तुला, कन्या, सिंह, कर्क, मिथुन, वृषभ आणि शेवटी मेष या राशींवर शनीचा प्रभाव दिसून येईल. मात्र हा प्रभाव त्रासदायकच असेल असे नाही, तर तो प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून राहणार आहे.
advertisement
विशेषतः कुंभ, मीन आणि मेष या राशींना 2026 मध्ये शनीची पीडा काही प्रमाणात जाणवू शकते. मात्र योग्य उपाययोजना आणि सकारात्मक कर्म केल्यास ही पीडा कमी करता येऊ शकते, असे गुरुजी सांगतात.
2026 मध्ये या चुका नकोच
शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला जातो. मनुष्य जसे कर्म करतो, त्याच प्रकारचे फळ शनी देतो. सत्य, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि संयम यांचा अवलंब केल्यास शनी अनुकूल ठरतो, तर खोटेपणा, फसवणूक आणि अन्याय केल्यास शनी कठोर भूमिका घेतो. त्यामुळे 2026 या कालावधीत सत्य बोलणे, सत्याचे आचरण करणे आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
शनीची पीडा कमी करण्यासाठी...
शनीची पीडा कमी करण्यासाठी कुंभ, मीन आणि मेष राशीच्या व्यक्तींनी 2026 मध्ये विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन तिळाचे तेल, काळे उडीद अर्पण करणे, शनी मंत्र व शनी स्तोत्राचे पठण करणे उपयुक्त ठरेल. तसेच हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण केल्यास शनीची पीडा कमी होते, असा अनुभव असल्याचे गुरुजी सांगतात.
advertisement
एकूणच 2026 हे वर्ष शनीच्या भीतीने घाबरण्याचे नसून आत्मपरीक्षणाचे आणि कर्म सुधारण्याचे आहे. अफवांवर विश्वास न ठेवता योग्य मार्ग अवलंबल्यास हे वर्ष अनेक राशींसाठी लाभदायक ठरू शकते, असे मत ज्योतिषाचार्य आदित्य जोशी गुरुजी यांनी व्यक्त केले आहे.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astrology 2026: नव्या वर्षात शनिची साडेसाती, 3 राशीवाले चुका महागात पडणार, कोणती सावधगिरी बाळगाल?
Next Article
advertisement
Dharashiv News : राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं तुळजापुरात खळबळ
राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं
  • राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं

  • राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं

  • राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं

View All
advertisement