Arthritis : सांध्यांचं दुखणं वाढवणारे पदार्थ खाणं टाळा, दुखणं आणि सूज वाढण्याआधी व्हा सावध

Last Updated:

संधिवात असेल तर आहाराच्या सवयींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. चुकीच्या आहारामुळे सूज आणि वेदना वाढू शकतात. संधिवाताच्या रुग्णांनी कोणते पदार्थ टाळावेत, जाणून घेऊया.

News18
News18
मुंबई : संधिवात म्हणजे सांध्यांना होणारा विकार. या आजारात सांध्यांमधे सूज, कडकपणा आणि वेदना जाणवतात. संधिवातावर कोणताही कायमस्वरुपी इलाज नसला तरी योग्य काळजी घेतली तर संधिवाताचं प्रमाण काही प्रमाणात नियंत्रित केलं जाऊ शकतं.
संधिवात असेल तर आहाराच्या सवयींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. चुकीच्या आहारामुळे सूज आणि वेदना वाढू शकतात. संधिवाताच्या रुग्णांनी कोणते पदार्थ टाळावेत, जाणून घेऊया.
संधिवात असेल तर हे अन्नपदार्थ खा -
- फॅटी फिश - सॅल्मन, सार्डिन आणि ट्यूनासारख्या माशांमधे ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतं, यामुळे सांध्यांमधली सूज आणि कडकपणा कमी होतो.
advertisement
- हिरव्या पालेभाज्या - पालक, केल आणि ब्रोकोलीमधे व्हिटॅमिन के, सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात, यामुळे हाडं मजबूत आणि सांधे निरोगी राखण्यास मदत होते.
- बेरी आणि चेरी - स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि चेरी सारख्या फळांमधे अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्स असतात. यामुळेही सूज कमी करण्यास मदत होते.
advertisement
- सुकामेवा - अक्रोड, बदाम, जवस आणि चिया सीड्स हे ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत, यामुळे संधिवाताच्या वेदना कमी करण्यास मदत होऊ शकते.
- हळद आणि आलं - कर्क्यूमिन आणि जिंजरॉलमधे शक्तिशाली दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे वेदना आणि सूज कमी करतात.
- ग्रीन टी - ग्रीन टीमधे असलेले पॉलिफेनॉल सांध्यांच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहे.
advertisement
- डाळी आणि बीन्स - राजमा, मसूर आणि हरभरा यात प्रथिनं आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, यामुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
- ऑलिव्ह ऑइल - ऑलिव्ह ऑइलमधले हेल्दी फॅट्स सूज कमी करण्यासाठी आणि सांधे लवचिक ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
संधिरोगासाठी सर्वात वाईट अन्न -
लाल मांस - यात सॅच्युरेटेड फॅट्स आणि प्युरिनचं प्रमाण जास्त असतं, यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढून संधिरोगाच्या वेदना वाढू शकतात.
advertisement
प्रक्रिया केलेले पदार्थ - पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि पॅकेज्ड स्नॅक्समधे ट्रान्स फॅट्स असतात, यामुळे सूज वाढते.
जास्त साखर - गोड पदार्थ, सोडा आणि मिष्टान्न यामुळे शरीरात सूज वाढते आणि लठ्ठपणा वाढतो, ज्यामुळे सांध्यांवर दबाव येतो.
रिफाइंड कार्ब्स - रिफाइंड पीठ, पांढरा ब्रेड आणि पास्ता यामुळे रक्तातील साखर आणि सूज वाढण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
अति मीठ - जास्त मीठामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होतं आणि हाडं कमकुवत होतात.
अल्कोहोल - अल्कोहोलमुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते, ज्यामुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात.
जास्त तळलेले पदार्थ - तळलेल्या पदार्थांमधे ट्रान्स फॅट्स असतात, ज्यामुळे शरीरात सूज आणि लठ्ठपणा वाढतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Arthritis : सांध्यांचं दुखणं वाढवणारे पदार्थ खाणं टाळा, दुखणं आणि सूज वाढण्याआधी व्हा सावध
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement