Bones Health : हाडांच्या आरोग्याला हानिकारक पदार्थ ठेवा दूर, हाडं होतील ठिसूळ, आरोग्यावर होतील वाईट परिणाम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हाडं हळूहळू कमकुवत होऊ शकतात. अनेक पदार्थांमुळे, शरीरातलं कॅल्शियम आणि खनिजं कमी करून हाडांचं नुकसान होतं. हे पदार्थ नियमित आणि जास्त खाल्ल्यानं हाडांची घनता कमी होते आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोका वाढतो.
मुंबई : हाडं म्हणजे शरीराचा आधार...शरीरशास्त्रातला मोठा अवयव.. आपल्या शरीरातील सर्वात मजबूत भाग म्हणजे हाडं. हाडं आपल्याला आकार देतात आणि शारीरिक हालचाली दरम्यान आपल्याला आधार देतात.
हाडं आपल्या शरीरासाठी ताकद आणि शरीराचा डोलारा सांभाळणारी महत्त्वाची रचना..वयाच्या प्रत्येक टप्प्यात आपल्या हाडांची काळजी घेणं महत्वाचं आहे. कारण वयानुसार हाडं कमकुवत होणं स्वाभाविक आहे. पण कधीकधी हा कमकुवतपणा केवळ वयामुळे नाही तर खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे देखील होते. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात.
खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हाडं हळूहळू कमकुवत होऊ शकतात. अनेक पदार्थांमुळे, शरीरातलं कॅल्शियम आणि खनिजं कमी करून हाडांचं नुकसान होतं. हे पदार्थ नियमित आणि जास्त खाल्ल्यानं हाडांची घनता कमी होते आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोका वाढतो.
advertisement
जास्त मीठ असलेले पदार्थ - मीठ अति खाणं हाडांसाठी हानिकारक आहे. जास्त मीठामुळे शरीरातील कॅल्शियम मूत्रमार्गे बाहेर पडतं. पॅकेज्ड स्नॅक्स, सॉस, लोणचं आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यात विशेषतः मीठ जास्त असतं, ज्यामुळे हाडं कमकुवत होऊ शकतात.
थंड पेयं - सॉफ्ट ड्रिंक्समधील फॉस्फोरिक अॅसिड आणि कॅफिन हाडांमधून कॅल्शियम बाहेर काढतात. थंड पेयं नेहमी प्यायल्यानं हाडांची घनता कमी होते आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो.
advertisement
कॅफिनयुक्त पेयं - कॉफी, चहा आणि एनर्जी ड्रिंक्ससारख्या पेयांमधील कॅफिनमुळे कॅल्शियम कमी होतं, त्यामुळे हाडांचं नुकसान होऊ शकतं.
अल्कोहोल - जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानं हाडांच्या पेशींची निर्मिती मंदावते आणि शरीरातील कॅल्शियमचं संतुलन बिघडतं.
साखरेचं प्रमाण जास्त असलेलं अन्न - शीतपेयं, कँडी, मिष्टान्न आणि बेक्ड पदार्थांमधे साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं शोषण रोखलं जातं.
advertisement
रिफाइंड पीठ, खूप पॉलिश केलेले तांदूळ आणि रिफाइंड धान्यांमधे फायबर आणि खनिजं कमी असतात. हे घटक जास्त खाल्ल्यानं हाडं पुरेसं पोषण मिळवू शकत नाहीत, ज्यामुळे ती हळूहळू कमकुवत होतात.
लाल मांस - लाल मांसात प्रथिनं आणि चरबी असते, पण ते जास्त खाल्ल्यानं शरीरातली आम्ल पातळी वाढते. हे संतुलित करण्यासाठी, शरीर हाडांमधून कॅल्शियम काढते, ज्यामुळे ती ठिसूळ होतात.
advertisement
जंक आणि डीप-फ्राईड फूड्स (जास्त तळलेले पदार्थ)- फास्ट फूड, फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि डीप-फ्रायड पदार्थांमधील ट्रान्स फॅट्स आणि प्रिझर्वेटिव्ह्ज शरीरात जळजळ निर्माण करतात. ही जळजळ हाडांची ताकद आणि खनिज संतुलन बिघडवते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 2:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bones Health : हाडांच्या आरोग्याला हानिकारक पदार्थ ठेवा दूर, हाडं होतील ठिसूळ, आरोग्यावर होतील वाईट परिणाम










