Leg Cramps : सतत पाय दुखत असतील तर अलर्ट व्हा, पाय दुखणं असू शकतं शरीरातल्या गंभीर आजारांचे संकेत, वाचा सविस्तर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पाय दुखणं ही सामान्य समस्या वाटत असली तरी शरीराच्या आत काहीतरी गंभीर घडत असल्याचे ते संकेत असू शकतात. हृदयाच्या समस्यांपासून ते इलेक्ट्रोलाइटचं असंतुलन, न्यूरोलॉजिकल समस्या आणि चयापचय समस्या अशा कोणत्याही कारणांमुळे पाय दुखू शकतात.
मुंबई : हात पाय दुखण्याचा त्रास अनेकांना होतो, प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं. तुम्हालाही पाय सतत दुखण्याचा त्रास होत असेल, चालताना पायात पेटके येत असतील तर अनेकदा किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केलं जातं.
पायात वारंवार क्रॅम्प येणं म्हणजेच पेटके येणं हे शरीरातील काही गंभीर समस्यांचं लक्षण असू शकतं. पाय दुखणं ही सामान्य समस्या वाटत असली तरी शरीराच्या आत काहीतरी गंभीर घडत असल्याचे ते संकेत असू शकतात. हृदयाच्या समस्यांपासून ते इलेक्ट्रोलाइटचं असंतुलन, न्यूरोलॉजिकल समस्या आणि चयापचय समस्या अशा कोणत्याही कारणांमुळे पाय दुखू शकतात.
पाच संभाव्य कारणांमुळे पायात पेटके येऊ शकतात ज्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण वेळेवर लक्ष दिलं तरच प्रकृतीचे अनेक गंभीर धोके टाळता येतील.
advertisement
धमनी व्याधी - पेरिफेरल आर्टरी डिसीजमुळेही पायात पेटके येऊ शकतात. ज्यांना हा त्रास आहे त्यांना चालताना पाय दुखतात आणि विश्रांती घेतल्यावर बरं वाटतं. पायांच्या धमन्यांमधे येत असलेल्या अडथळ्यांमुळे हा त्रास होतो.
Venus Inefficiency मुळेही पायात पेटके येऊ शकतात असं हृदयरोगतज्ज्ञांनी म्हटलंय. यात मुख्यत: दिवस कलताना, म्हणजे संध्याकाळी पाय जड वाटणं, रात्री सूज येणं आणि पेटके येणं अशी लक्षणं जाणवू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
advertisement
शिरांची व्याधी - ज्यांना नसांचे विकार आहेत त्यांनाही पायात पेटके येण्याचा त्रास होऊ शकतो. सायटिका, न्यूरोपॅथी आणि कंबरेसह नसांच्या समस्यांमुळेही पायात पेटके येऊ शकतात.
चयापचय आणि हार्मोनल समस्या - थायरॉईड विकार, अशक्तपणा आणि व्हिटॅमिन डीची कमतरता यासारख्या चयापचय आणि हार्मोनल समस्यांमुळे पाय दुखू शकतात.
advertisement
इलेक्ट्रोलाइट्स - इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे म्हणजेच मुख्यत: मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पायांत पेटके येऊ शकतात. तसंच डिहायड्रेशन असलेल्यांनाही हा त्रास जाणवू शकतो.
ही काही कारणं आहेत, पाय सतत दुखत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 12:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Leg Cramps : सतत पाय दुखत असतील तर अलर्ट व्हा, पाय दुखणं असू शकतं शरीरातल्या गंभीर आजारांचे संकेत, वाचा सविस्तर









