फक्त एक वर्ष द्या! घरात हालाकीची परिस्थिती, वडिलांसोबत मजुरी, श्रेयस अय्यरसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणार

Last Updated:
गोरखपूरच्या विशाल निषादने पंजाब किंग्सकडून 30 लाखांची आयपीएल बोली मिळवत संघर्षावर मोठा विजय मिळवला. कोच कल्याण सिंह यांच्या मार्गदर्शनाने त्याची कहाणी प्रेरणादायी ठरली.
1/7
फोटो सौजन्य - पंजाब किंग्स
16 डिसेंबर ही फक्त त्याच्या आयुष्य़तली एक तारीख नाही तर नवी संधी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी पडलेलं एक पुढचं पाऊल होतं. त्याच्या आणि कोचच्या प्रयत्नांना यश आलं, त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं. आता श्रेयस अय्यरसोबत तो ड्रेसिंग रुम शेअर करणार आहे. तो एका रात्रीत लखपती झाला आहे. त्याच्या जिद्दीला यश मिळालं आहे. अवघ्या 22 वर्षांच्या विशाल निषादच्या संघर्षाची ही कहाणी प्रेरणादायी आहे. फोटो सौजन्य - पंजाब किंग्स
advertisement
2/7
उत्तर प्रदेशातील गोरखपूरहून आलेल्या 22 वर्षीय फिरकी गोलंदाज विशाल निषाद याची आयपीएल लिलावात अखेर मेहनतीला दाद मिळाली. पंजाब किंग्सने विशालला 30 लाख रुपयांच्या बोलीवर आपल्या टीममध्ये घेतलं. कधीकाळी वडिलांसोबत मजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या विशालसाठी हा क्षण केवळ करिअरचा टप्पा नाही, तर संघर्षावर मिळालेला सर्वात मोठा विजय होता. - फोटो सौजन्य पंजाब किंग्स

3/7
विशाल आपल्या वडिलांसोबत उमेश निषाद यांच्यासोबत घर चालवण्यासाठी गवंडी कामाला जात होता. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी विशालही लहान वयातच वडिलांसोबत मजुरी करायचा. दिवस कष्टाचा, संध्याकाळ टेनिस बॉलने क्रिकेटचा सराव करायचा. परिस्थिती कठीण होती, पण क्रिकेटची ओढ ते स्वप्न त्याला कधी शांत झोपू द्यायचं नाही. फोटो सौजन्य- पंजाब किंग्स

4/7
विशालच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती त्याचे कोच कल्याण सिंह यांच्यामुळे. साधारण तीन वर्षांपूर्वी गोरखपूरमध्ये काही मुले टेनिस बॉलने क्रिकेट खेळताना दिसली. त्यात विशालची फिरकी गोलंदाजी वेगळीच भासली. कोच कल्याण सिंह यांनी त्याला संस्कृती क्रिकेट अकादमीत सरावासाठी बोलावले आणि इथूनच विशालची क्रिकेटच्या करियरला पाठबळ मिळालं

5/7
कोच कल्याण सिंह सांगतात की, विशालच्या घरची परिस्थिती पाहून त्यांनी थेट वडिलांशी बोलायचं ठरवलं. सुरुवातीला वडिलांचा प्रश्न साधा होता, क्रिकेटमधून काय मिळणार? त्यावर कोचने एकच गोष्ट सांगितली, फक्त एक वर्ष संधी द्या, या मुलात काहीतरी वेगळं आहे. त्या विश्वासावर विशालने मजुरी सोडली आणि पूर्ण वेळ क्रिकेटसाठी स्वतःला झोकून दिलं.

6/7
अथक मेहनतीचं फळ विशालला यूपी क्रिकेट लीगमध्ये मिळालं. गोरखपूर लायन्स संघाकडून पहिल्या सिझनमध्ये त्याला चारच सामने खेळायला मिळाले, मात्र त्यात त्याने आठ विकेट्स घेत सर्वांचं लक्ष वेधलं. दुसऱ्या सिझनमध्ये संघाने त्याला रिटेन केलं. सध्या विशालला विजय हजारे ट्रॉफीसाठीही बोलावण्यात आलं, जे त्याच्या वाढत्या कारकिर्दीचं मोठं पाऊल मानलं जात आहे.

7/7
कोच कल्याण सिंह यांच्या मते, विशाल हा वरुण चक्रवर्तीसारखा मिस्ट्री स्पिनर आहे. योग्य संधी आणि सातत्य मिळालं तर तो आणखी मोठी झेप घेऊ शकतो. भविष्यात त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी नक्कीच मिळेल, असा विश्वास कोचने व्यक्त केला.

Dharashiv News : राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं तुळजापुरात खळबळ
राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं
  • राडा प्रकरणात भाजप आमदाराच्या पीएचं नाव, ड्रग्ज प्रकरणानंतर आता गावठी पिस्तुलानं

View All
advertisement