Indian Railway : रेल्वे ट्रॅकवर 'W/L' बोर्ड का लावला जातो? कोणासाठी आणि काय असतो हा संकेत?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
W/L board on railway track : रेल्वे ट्रॅकच्या कडेला पिवळ्या रंगाचे छोटे बोर्ड दिसतात, ज्यावर काळ्या अक्षरात W/L असं लिहिलेलं असतं. हे बोर्ड नेमकं काय काम करतात आणि लोको पायलटसाठी (रेल्वे ड्रायव्हर) ते इतके महत्त्वाचे का असतात माहितीय?
मुंबई : रेल्वेने प्रवास करताना तुम्ही खिडकीच्या बाहेर पाहिलं असेल, तर रेल्वे ट्रॅकच्या कडेला पिवळ्या रंगाचे छोटे बोर्ड दिसतात, ज्यावर काळ्या अक्षरात W/L असं लिहिलेलं असतं. हे बोर्ड नेमकं काय काम करतात आणि लोको पायलटसाठी (रेल्वे ड्रायव्हर) ते इतके महत्त्वाचे का असतात माहितीय? भारतीय रेल्वेने प्रवास करताना ट्रॅकच्या कडेला अनेक प्रकारचे संकेत फलक लावलेले असतात. त्यातलाच एक सर्वात महत्त्वाचा बोर्ड म्हणजे 'W/L'. सामान्य प्रवाशांसाठी हे केवळ दोन शब्द असले, तरी लोको पायलटसाठी हा एक मोठा इशारा असतो.
W/L चा अर्थ काय?
W/L या शब्दाचा फुल फॉर्म आहे - Whistle for Level Crossing (लेव्हल क्रॉसिंगसाठी शिट्टी/हॉर्न वाजवा). मराठीत सांगायचं झालं तर, समोर 'रेल्वे फाटक' (Level Crossing) येणार आहे, त्यासाठी हॉर्न वाजवा. काही ठिकाणी मराठी किंवा हिंदी भाषेच्या भागात याच बोर्डवर 'सी/फा' (सीटी बजाओ/फाटक) असंही लिहिलेलं असतं.
हा बोर्ड ट्रॅकवर कुठे असतो?
रेल्वेच्या नियमांनुसार, हा बोर्ड रेल्वे फाटकापासून साधारण 600 मीटर आधी लावला जातो. हा बोर्ड पिवळ्या रंगाचा असतो आणि त्यावर काळ्या रंगात अक्षरं असतात, जेणेकरून दिवसा आणि रात्रीच्या वेळी इंजिनच्या प्रकाशात तो स्पष्ट दिसावा.
advertisement
हा बोर्ड पाहून लोको पायलट काय करतात?
लोको पायलट जसा हा 'W/L' बोर्ड बघतो, तसा तो रेल्वेचा हॉर्न वाजवायला सुरुवात करतो. हा हॉर्न सलग किंवा एका विशिष्ट लयीत वाजवला जातो. याचा उद्देश असा असतो की, पुढे असलेल्या रेल्वे फाटकावर जे लोक, वाहनं किंवा प्राणी रस्ता ओलांडत असतील, त्यांना सावध करणं. हा इशारा ऐकून फाटकावरचा कर्मचारी (Gate-man) देखील अलर्ट होतो आणि फाटक बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करतो.
advertisement
हा बोर्ड का महत्त्वाचा आहे?
अनेकदा रेल्वे फाटकावर लोकांची गर्दी असते किंवा काही ठिकाणी मानवरहित (Unmanned) फाटकं असतात. अशा वेळी रेल्वेचा वेग जास्त असल्याने ती अचानक थांबवता येत नाही. त्यामुळे 600 मीटर आधीच हॉर्न वाजवल्यामुळे अपघात टाळण्यास मोठी मदत होते.
थोडक्यात सांगायचं तर...
view comments'W/L' बोर्ड हा रेल्वे आणि रस्ते वाहतूक यांच्यातील सुरक्षेचा एक दुवा आहे. लोको पायलटसाठी हा एक 'रिमाइंडर' असतो की आता शांत बसून चालणार नाही, तर हॉर्न वाजवून समोरच्यांना आपल्या येण्याची चाहूल द्यायची आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 8:48 PM IST
मराठी बातम्या/देश/
Indian Railway : रेल्वे ट्रॅकवर 'W/L' बोर्ड का लावला जातो? कोणासाठी आणि काय असतो हा संकेत?










