छत्रपती संभाजीनगर : लवकरच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने आपण आज छत्रपती संभाजीनगर शहराची ग्रामदेवता असलेल्या कर्णपुरा मातेच्या मंदिराबाबत जाणून घेऊयात.
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरामध्ये देवीचे हे मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्रीत देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. तर या कर्णपुरा देवीचा इतिहास काय आहे, हे मंदिर किती वर्षे जुने मंदिर आहे, याविषयी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अंबादास दानवे यांनी सविस्तर माहिती दिली.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहराची ग्रामदेवता ही कर्णपुरा देवी आहे. याठिकाणी कर्णपुरा देवीचे 350 वर्षे जुने मंदिर आजही आहे. राजस्थानातून आलेल्या कर्णसिंग राजाने या मंदिराची उभारणी केली. राजस्थानमधील बिकानेर येथील राजा कर्णसिंग 1835 मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते. छावणी परिसरातील कर्णपुरा येथे त्यांचे वास्तव्य होते. राजा कर्णसिंग राजस्थान येथील कर्णिका मातेचे भक्त होते. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी कर्णिका मातेचे मंदिर बांधायचे ठरवले. त्यानंतर या मंदिराची उभारणी करण्यात आली.
स्पेशल पुणेरी भेळ, 82 वर्षांची आहे परंपरा, पण नेमकी मिळते कुठे? VIDEO
हे मंदिर राजस्थानी शैलीने उभारण्यात आले होते. यानंतर 1982 मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. कर्णसिंग यांचे या परिसरात 20 ते 25 वर्षे वास्तव्य होते. त्यानंतर येथील दानवे कुटुंबाकडे या मंदिराचे पुजारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. दानवे कुंटुबाची सातवी पिढी सध्या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत. दानवे कुटुंबीय हे 9 दिवस देवीची पूजा अर्चना अगदी मनोभावे करतात. कर्णपुराची देवी नवसाला पावणारी देवी म्हणूनही ओळखली जाते, असे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
कर्णपुरामध्ये 9 दिवस मोठी यात्रा भरण्यात येते. या ठिकाणी अनेक असे दुकाने देखील लागतात. खूप मोठी यात्रा या ठिकाणी भरवण्यात येते. दूरवरून लाखोंच्या संख्येने भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येतात. असा या कर्णपुरा देवीचा इतिहास आहे.