या भेटीनंतर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाद होते पण ते वैचारिक हक्काचे होते. आता एकत्र काम करू आणि जिंकू आम्ही दोघेही मित्रच फक्त आमच्या आपेक्षा होत्या त्या दाखवल्या असं दानवे यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मात्र याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे देखील इच्छूक होते. त्यांनी आपली इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. मात्र खैरे यांना या मतदारसंघातून तिकीट जाहीर झालं. खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर दानवे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आज दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांची भेट घेऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement