आजकाल बाहेर जाऊ नको वेळ झाली, लवकर परत ये अशा आई-वडिलांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या मुली आता म्हणतात कोणी धक्का देईल तर त्याला जमिनीवरच लोळवेन. हा बदल सहज नाही होत. त्यासाठी तायक्वांदो, ज्युडो असे विविध प्रकारचे खेळ शिकून आत्मरक्षण करता येते. फक्त मुलींनी तयारी दाखवली पाहिजे.
advertisement
एका आठवीत शिकणाऱ्या मुलीसोबत अंगावर शहारा आणणारा एक प्रसंग घडला. झाले असे की एक मुलगा रोज तिला त्रास द्यायचा. नंतर त्या मुलाचा शोध घेतला मात्र तो दिसला नाही. मग आत्मरक्षणाचे प्रशिक्षण घेतले आणि काही दिवसांनी चक्क त्या मुलाच्या घरी जाऊन त्याला चांगलाच धडा शिकवले. आज मी कुठेही जाताना भीत नाही, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. त्यामुळे महिलांनी किमान आपले स्वतःचे रक्षण करता येईल एवढे तरी प्रशिक्षण घेतले पाहिजे.
भाग्यश्री यांचे पती शंकर महाबळे हे देखील गेल्या 27 वर्षांपासून आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे काम करतात. लग्न झाल्यानंतर त्यांनी पत्नीला देखील आत्मरक्षणाचे धडे शिकवले. आणि त्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली स्वतःच्या आत्मविश्वासावर उभ्या राहिल्या आहेत. तसेच येथील 72 विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवलेले आहेत.