भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 1 ते 3 एप्रिल दरम्यान जड वाहनांच्या वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बदललेले वाहतूक मार्ग असे
कन्नड, वेरूळ, खुलताबाद, दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कन्नड, वेरूळ, कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा, शरणापूर फाटामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
advertisement
छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरूळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेड फाटा, वेरूळमार्गे कन्नडकडे जातील.
फुलंब्री, सुलतानपूर, खुलताबाद, वेरूळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेड फाटा, वेरूळमार्गे कन्नडकडे जातील.
प्रशासनाने वाहनचालकांना दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, नागरिकांनीही वाहतूक व्यवस्थापनात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






