TRENDING:

सततची पोटदुखी, डॉक्टरांनी तपासताच दिसलं भयंकर, महिलेच्या पोटातून काढला 7 किलोचा गोळा!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: सततच्या पोटदुखीने हैराण महिलेवर छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली. यामध्ये महिलेच्या पोटातून तब्बल 7.15 किलोचा गोळा काढण्यात आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: काही वेळा आरोग्याशी संबंधित गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत असतात. वैद्यकशास्त्राच्या आधारे त्यावर उपाय देखील केले जातात. नुकतेच छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात अशीच एक किचकट शस्त्रक्रिया झाली आहे. यामध्ये एका 60 वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल 7.15 किलो वजनाचा गोळा काढला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला सुरक्षित आणि सुखरुप आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
advertisement

छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये एक 60 वर्षांची महिला उपचारासाठी आली होती. गेल्या एक ते दीड वर्षापासून या महिलेच्या पोटात दुखत होते. डॉक्टरांनी तपासणी केली असताना त्यांच्या पोटात गाठ असल्याचे निदान झाले. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. डॉक्टरांनी अतिशय किचकट शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेच्या पोटातून गाठ बाहेर काढली. विशेष म्हणजे ही गाठ तब्बल 7.15 किलो वजनाची असून हा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला.

advertisement

Horse: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नादच खुळा, घोड्यावर बसून रुबाबात जातो शाळेत,Video

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सर्जन डॉ. कमलाकर मुतखेडकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही अवघड शस्त्रक्रिया पार पाडली. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना तब्बल दोन तास एवढा कालावधी लागला. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया अगदी मोफत झालेली आहे. जरी शस्त्रक्रिया दुसऱ्या कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असती तर त्यासाठी दोन ते तीन लाख रुपये एवढा खर्च आला असता. परंतु, आम्ही ही अवघड शस्त्रक्रिया अगदी मोफत केल्याचे डॉ. मुतखेडकर यांनी सांगितले.

advertisement

महिलांनी काळजी घ्यावी

“माझ्या करिअरमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पोटात एवढा मोठा गोळा मी पहिल्यांदाच पाहिला. कदाचित संभाजीनगर शहरांत हा असा प्रकार पहिलाच असावा,” असेही डॉक्टर म्हणाले. तर सर्व महिलांनी आपली काळजी घ्यावी. कुणाच्या पोटात दुखत असेल किंवा मासिक पाळीचा त्रास असल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटावे आणि योग्य उपचार घ्यावेत, असा सल्ला डॉ. स्मिता चव्हाण यंनी दिला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
सततची पोटदुखी, डॉक्टरांनी तपासताच दिसलं भयंकर, महिलेच्या पोटातून काढला 7 किलोचा गोळा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल