Horse: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नादच खुळा, घोड्यावर बसून रुबाबात जातो शाळेत,Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आदर्श साळुंखे हा शाळेला जाताना घोड्यावर बसून रुबाबाने जात आहे. घोड्यावर शाळेला जाणारा आदर्श साळुंखे हा विद्यार्थी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाला आहे.
सोलापूर : एकीकडे मुलांना शाळेला पाठवण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. कधी शाळेची बस, कधी रिक्षा, कधी दुचाकीवर तर कधी पायी चालत जाऊ शाळेत सोडावे लागते. पण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथील आदर्श साळुंखे हा शाळेला जाताना घोड्यावर बसून रुबाबाने जात आहे. घोड्यावर शाळेला जाणारा आदर्श साळुंखे हा विद्यार्थी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाला आहे.
बार्शी तालुक्यातील वैराग हे गाव मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. गावातील मुख्य चौकातून आदर्श साळुंखे हा विद्यार्थी घोड्यावर रुबाबाने बसून शाळेवर जात असताना काही गावकऱ्यांनी पाहिलं. तर काही तरुणांनी हा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे आदर्श साळुंखे हा घोड्यावर बसून जाणारा विद्यार्थी म्हणून त्याची ओळख झाली. आजही अनेक विद्यार्थी वाडी वस्तीवर राहत असून आजही त्यांना दुसऱ्यांच्या वाहनांवर किंवा पायी चालत शाळेला जाण्याशिवाय पर्याय नाही.
advertisement
आदर्श साळुंखे यांच्या आजोबाकडे सात घोडे आणि दीडशे शेळ्या आहेत. आदर्शला शाळेला जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसेल तेव्हा तो कोणाची वाट न बघता थेट आपल्याजवळ असलेल्या घोड्यावर बसून तो शाळेला जातो. सध्या आदर्श साळुंखे हा वैराग मधील साधना प्रशालेमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. आदर्श घोड्यावरून शाळेला आल्यावर शाळेच्या शेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाला त्या घोड्याला बांधतो. शाळेच्या मधल्या सुट्टीत घोड्याला पिण्यासाठी पाणी, चारा देतो.
advertisement
कोणत्याही वाहनाची वाट न बघता घोड्यावर का होईना शाळेला येऊन हजेरी लावून त्याची शिक्षणाबद्दलची असलेली गोडी यातून लक्षात येते. आदर्श हा शाळेला बसमधून येतो किंवा घोड्यावर येतो हे महत्त्वाचे नसून त्याला असलेले शिक्षणाची आवड हे महत्त्वाचे आहे, असं मत साधना प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील हुक्केरे यांनी व्यक्त केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jul 14, 2025 1:34 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Horse: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नादच खुळा, घोड्यावर बसून रुबाबात जातो शाळेत,Video







