सायंकाळी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. सायंकाळच्या 5 वाजेच्या सुमारास एका शेतवस्तीवरील गोठ्यात अचानक घुसून बिबट्याने वासरावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, काही क्षणांमध्येच गंभीर प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
संभाजीनगर हादरलं! सकाळी शेतात गेला, तो परतालच नाही, माजी सरपंचाच्या मुलासोबत संक्रांतीलाच भयंकर घडलं
advertisement
ही घटना पंढरीनाथ सांगळे ( गट क्र.246 ) यांच्या शेतातील गोठ्यात घडली. वासरावर बिबट्याने जोरदार हल्ला करत जबड्यावर घाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच गोठ्यात बांधलेल्या बैलाने आक्रमक पवित्रा घेत बिबट्यावर झडप घातल्याने बिबट्याने माघार घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या प्रसंगात वासराचा जीव वाचला असला तरी त्याला गंभीर जखमा झाल्या असून उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी एस. एस. राजपूत व वनमजूर प्रभाकर दारकुंडे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत वासराच्या शरीरावर आढळलेल्या दात व नखांच्या खुणांवरून हा हल्ला बिबट्याचाच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर परिसर जंगलालगत असल्याने बिबट्याची हालचाल वाढलेली असून, वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






