TRENDING:

दोन मुलांची आई प्रेमात पडली; पण इन्स्टावरची ‘ती’ ओळख भोवली, गर्भवती महिलेसोबत भयंकर प्रकार

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: सुमारे 30 वर्षीय पीडित महिलेचा यापूर्वी विवाह झाला होता. तिला 8 आणि 5 वर्षांची दोन मुले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली ओळख एका महिलेच्या आयुष्यात भयावह वळण घेऊन आली आहे. अमरावती (विदर्भ) येथील विवाहित महिलेची फसवणूक करत एका युवकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. लग्नाचे आश्वासन देत आरोपीने तिच्याशी संबंध ठेवले. सध्या पीडित महिला साडेपाच महिन्यांची गर्भवती आहे; मात्र आता आरोपीने लग्नास नकार देत गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला असून विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar: दोन मुलांची आई प्रेमात पडली; पण इन्स्टावरची ‘ती’ ओळख भोवली, गर्भवती महिलेसोबत भयंकर प्रकार
Chhatrapati Sambhajinagar: दोन मुलांची आई प्रेमात पडली; पण इन्स्टावरची ‘ती’ ओळख भोवली, गर्भवती महिलेसोबत भयंकर प्रकार
advertisement

‎या प्रकरणात अमरावती येथील पीडित महिलेने राजनगाव (ता. गंगापूर) येथील रेहान मोहम्मद शेख याच्याविरोधात अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अंत्यविधीला हजेरी अन् काही वेळातच श्रद्धांजली! डॉक्टरसोबत भयंकर घडलं, छ. संभाजीनगर हळहळलं

advertisement

‎सुमारे 30 वर्षीय पीडित महिलेचा यापूर्वी विवाह झाला होता. तिला 8 आणि 5 वर्षांची दोन मुले आहेत. पती दारूच्या व्यसनाधीन असल्यामुळे ती त्याच्यापासून विभक्त झाली असून सध्या अमरावती येथे आईकडे मुलांसह राहत आहे. एप्रिल 2025 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून आरोपी आणि पीडित महिलेची ओळख झाली. नंतर मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण होऊन दोघांमध्ये संपर्क वाढत गेला आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले.

advertisement

View More

आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत 19 मे 2025 रोजी तिला अमरावतीहून छत्रपती संभाजीनगर येथे बोलावले. तेथून तिला राजनगाव येथे नेऊन दोन दिवस तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपी अमरावतीत तिच्या आईच्या घरीही गेला आणि तेथेही तिच्याशी संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे.

‎सध्या पीडित महिला साडेपाच महिन्यांची गर्भवती आहे. तिने आरोपीकडे लग्नाची मागणी केल्यानंतर आरोपीने आपली भूमिका बदलली. त्याने गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला तसेच गर्भपात केला नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

‎धमक्यांमुळे घाबरलेल्या पीडित महिलेने अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी प्रकरण एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. पीडित महिलेने सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांची भेट घेऊन संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दोन मुलांची आई प्रेमात पडली; पण इन्स्टावरची ‘ती’ ओळख भोवली, गर्भवती महिलेसोबत भयंकर प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल