या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये सासरा, सासू, मेहुणा आणि साडू यांचा समावेश आहे. तक्रारदार सुलेमान हसन शहा (वय 24, रा. मिसारवाडी, वैशाली धाब्याजवळ) हे आपल्या आई-वडील आणि भावासोबत राहतात. त्यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला असून पत्नी सध्या माहेरी गुजरातमधील हरगुळ येथे वास्तव्यास आहे.
advertisement
लग्नानंतर सासरकडील मंडळींकडून सुलेमान यांच्यावर सासरीच राहण्याचा दबाव टाकण्यात येत होता. यापूर्वीही याच कारणावरून त्यांना मारहाण झाल्याचा आरोप असून त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरला परतले होते. मात्र, 17 डिसेंबर रोजी सकाळी अचानक सासरकडील मंडळी त्यांच्या घरी पोहोचली. ‘सासरी राहायला का आला नाहीस?’ असा जाब विचारत शिवीगाळ करण्यात आली आणि मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या वेळी पुढील परिणामांची धमकीही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.






