आईकडून अचानक मोठी रक्कम खात्यात जमा झाल्याचा मेसेज मिळताच मुलगा अस्वस्थ झाला. त्याने तात्काळ वडिलांना फोन करून आईबद्दल चौकशी केली आणि घरी जाण्याची विनंती केली. काही वेळातच राजेश शेलार घरी पोहोचले. मात्र घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. दरवाजा उघडल्यावर समोर आलेले दृश्य काळीज पिळवटून टाकणारे होते. वैशाली या छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
advertisement
वैशाली व राजेश शेलार हे दोघेही मेहगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच सहायक फौजदार नासेर पठाण, पोलिस कॉन्स्टेबल सतीश नरोडे, नामदेव गाडेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वैशाली यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास कन्नडचे सहायक फौजदार पठाण करीत आहेत. वैशाली यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.






