TRENDING:

छ. संभाजीनगरात या रस्त्यांवर ‘नो एन्ट्री’, ईदमुळे वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: ईदनिमित्त नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 21 मार्च रोजी छावणी आणि रोजाबाग येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.
छ. संभाजीनगरात या रस्त्यांवर ‘नो एन्ट्री’, ईदमुळे वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग
छ. संभाजीनगरात या रस्त्यांवर ‘नो एन्ट्री’, ईदमुळे वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग
advertisement

‎ 21 मार्च रोजी पहाटे 5 ते सकाळी 11 या कालावधीत शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेषतः मिलिंद चौक ते विद्यापीठ रस्ता या मार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच लॉ कॉलेज ते पाणचक्की गेट या मार्गावरील वाहतूक वळवून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

‎ नोकरी करतानी व्यवसायाची आयडिया सुचली, घरातून सुरू केला मसाले ब्रँड, महिन्याला 1 लाख कमाई

‎वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी यासंदर्भात माहिती देत नागरिकांनी सहकार्य करावे आणि दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.

‎हे असतील पर्यायी मार्ग

‎1. विद्यापीठाकडे : मिलिंद चौक ते विद्यापीठ गेट या मार्गावरील वाहने मिलिंद चौक, बारापुल्ला गेट, मिलकॉर्नर, ज्युबिली पार्क, टाऊन हॉल आणि मकाई गेट या मार्गाचा वापर करू शकतील.

advertisement

‎2. घाटी/पाणचक्कीकडून मिलिंद ‎चौकाकडे : घाटी हॉस्पिटल आणि पाणचक्कीमार्गे मिलिंद चौकाकडे येणारी वाहने ज्युबिली पार्क, मिलकॉर्नर आणि बारापुल्ला गेटमार्गे जातील.

‎3. बेगमपुऱ्याकडे : घाटी, पाणचक्कीकडून विद्यापीठ गेट किंवा बेगमपुऱ्याकडे जाणारी वाहने ज्युबिली पार्क, टाऊन हॉल आणि मकाई गेट मार्गाचा वापर करतील.

‎4. हडको कॉर्नर परिसर : हडको कॉर्नर ते उद्धवराव पाटील चौकाकडे जाणारी-येणारी वाहतूक केवळ एकाच बाजूने सुरू राहील.

advertisement

‎हे मार्ग राहतील बंद

‎1. मिलिंद चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट

‎2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज ते पाणचक्की गेट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

‎3. हडको कॉर्नर ते उद्धवराव पाटील चौक या मार्गावरील वाहतूक एका बाजूने बंद असेल

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगरात या रस्त्यांवर ‘नो एन्ट्री’, ईदमुळे वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल