स्मार्ट सिटी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्याला शहरामध्ये दहा ते बारा दिवसाआड पाणी हे नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. वेळेवर पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागते आणि त्यासोबतच पिण्यासाठी जारचे पाणी घ्यावे लागते. त्यामुळे महिलांना त्याचबरोबर सर्वांना त्याचा खूप त्रास होत आहे. यामुळे शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेचा कार्यालयात जाऊन हे आंदोलन केलेलं आहे.
advertisement
'आम्ही पालकमंत्र्यांना शंभर ते दीडशे वेळा फोन केलेला आहे. पण त्यांनी आम्हाला कुठलाच रिस्पॉन्स दिलेला नाहीये. तसंच आम्हाला, आमच्या भगिनींना याचा खूप त्रास होत आहे. पाण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे हे द्यावे लागत आहेत. जिल्ह्यात एवढे मोठे धरण असून देखील याचा काही एक उपयोगात शहरातील नागरिकांना होत नाही. आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. पण या ठिकाणी कुठलाच महानगरपालिकेचा अधिकारी हा उपस्थित नाहीये याची खंत आहे', असं नागरिकाने सांगितलं.
'आम्हाला पाणी मिळत नाही. यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आम्हाला प्रत्येक वेळेस पाणी विकत घ्यावे लागत आहे. आम्ही जो महानगरपालिकेचा नळपट्टी भरतो ती आम्ही कशासाठी भरतो? पाणी यावे यासाठी भरतो. पण महानगरपालिका आम्हाला वेळेवर पाणी सोडत नाही. यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत. तर आम्हाला वेळेवर पाणी द्यावं', अशी आमची मागणी आहे असंही नागरिकांनी सांगितलं.





