छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता अवघ्या 2 तासात तुम्हाला गोवा गाठता येणार आहे. शहरातून गोवा, नागपूर आणि लखनऊसाठी 2 जुलै 2024 पासून विमानसेवा सुरू होत आहे. इंडिगो कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली असून त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरहून फक्त 2 तासात गोव्याला जाता येईल. तर, नागपूरला जाण्यासाठी दीड तास लागेल आणि लखनऊला साडेतीन तासांत पोहोचता येईल.
advertisement
शहरातून गोव्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल बसशिवाय पर्याय नव्हता. त्यातही ट्रॅव्हल्स किंवा खासगी वाहनानं गोवा गाठताना 12 तासांपेक्षा अधिक वेळ जातो. परंतु आता सकाळी 11.30 वाजता सुटणाऱ्या विमानानं हा प्रवास केवळ 2 तासात पार होईल. तर, नागपूरला जाणारं विमान संध्याकाळी 4.40 वाजता निघेल. लखनऊला जाणाऱ्या विमानाचीही हीच वेळ असेल.
हेही वाचा : विमानाचं तिकीट आठवड्याच्या 'या' दिवशी सकाळी बुक करायचं, स्वस्तात होतो प्रवास!
चिकलठाणा विमानतळावरून मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. तर, आता इंडिगोकडून 78 आसनी विमानाद्वारे गोवा, नागपूर आणि लखनऊ या 3 शहरांसोबतही छत्रपती संभाजीनगर कनेक्ट होणार आहे.
आठवड्याच्या 'या' दिवशी जाता येईल विमानानं
मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या 3 दिवशी ही विमानसेवा सुरू असेल. मूळ लखनऊवरून सुरू होऊन विमान गोव्यापर्यंत जाईल, तर गोव्यावरून निघून छत्रपती संभाजीनगर, नागपूर ते लखनऊपर्यंत विमान जाईल.
तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असाल आणि गोव्याला जाण्याचा प्लॅन सुरू असेल, तर आता तो फिस्कटणार नाही. कारण आता तुम्ही फक्त 2 तासात गोव्याला जाऊ शकता. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि जास्त एन्जॉय करायला मिळेल. चला मग, लवकर लवकर गोव्याचं तिकीट बुक करा.