छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळामधील पहिला अर्थसंकल्प काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यावेळी निर्मला सीताराम यांनी सलग सात वेळा हा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक अशा घोषणा करण्यात आलेला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टींचे भाव वाढणार आहेत. तर तर काही गोष्टींचे भाव हे कमी होणार आहेत. मात्र, यासोबतच या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात मोठी घोषणाही करण्यात आली आहे. यामध्ये सोन्यावरील कस्टम ड्युटी चार्ज कमी करण्यात आला आहे. यामुळे बाजारपेठेत सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात उतरले आहेत.
advertisement
यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने सराफ व्यापारी हर्षल देवडा यांच्याशी संवाद साधला. यावेळी लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये सध्याला सोन्याचा भाव हा अडीच-तीन हजाराने कमी झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सोन्याचा भाव हा 70 हजार रुपये प्रति तोळा आहे. ही घोषणा होण्याच्या अगोदर भाव हा 73 हजार रुपये प्रति तोळा होता. यामुळे आता याठिकाणी 3 हजार रुपयांनी सोन्याच्या दरात घट झाली आहे. याचा फायदा हा आमच्यापेक्षा ग्राहकांना जास्त होणार आहे, असे ते म्हणाले.
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईमध्ये दरात प्रचंड घट, नवे दर पाहून बसणार नाही विश्वास
पण दुसरीकडे सध्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ग्राहक अजूनही भाव कमी होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, सध्यातरी यापेक्षाही सोन्याच्या दरात घट होईल, असे व्यापाऱ्यांना वाटत नाही. त्यामुळे सध्या ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा, असे व्यापारी सांगत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी बघायला मिळेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.





