छत्रपती संभाजीनगर : आपण अनेक वेळा ऐकतो की अनेक महाविद्यालयांमध्ये सीनियर विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग होते आणि याचा वाईट परिणाम हा विद्यार्थ्यांवर होतो. त्यामुळे हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय दंत महाविद्यालयात एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 'बडी' असे या नवीन उपक्रमाचे नाव आहे. हा उपक्रम नेमका काय आहे, विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होणार होणार, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर यांच्याशी संवाद साधला.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, रॅगिंग करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीसुद्धा अनेक वेळा महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांची त्यांच्या सीनिअर विद्यार्थ्यांनी रॅगिंग करतात. पण या रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तर या सर्व गोष्टी थांबविण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालयामध्ये 'बडी' नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जे आपले सीनिअर विद्यार्थी आहेत, ते नवीन घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्व गोष्टींमध्ये मदत करतील. या उपक्रमांतर्गत जे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांची जबाबदारी ही त्यांच्या सीनियर विद्यार्थ्यांवर देण्यात येत आहे. म्हणजे नवीन विद्यार्थी आणि एक सीनियर, असं हे गणित असणार आहे.
शिक्षण फक्त 7 वी पास, परिस्थितीवर केली मात, उभारला मोठा उद्योग, आज हजारो कर्मचारी कामाला!
त्यामुळे सिनियर विद्यार्थ्यांकडे जे ज्युनिअर विद्यार्थी दिलेले आहेत ते या विद्यार्थ्यांना सर्व बाबीत मदत करतील. सर्व गोष्टीतील माहितीही त्यांना सांगतील. जसे की, पुस्तके कुठून खरेदी करायचे, कोणते पुस्तक वाचायचे, कशा पद्धतीने अभ्यास करावा, तसेच जर काही अडचण आली तर सीनियर विद्यार्थी हे जुनियर विद्यार्थ्यांना मदत करतील. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये सर्व गोष्टी समजून घ्यायला मदत होईल आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही, याची काळजी देखील या सीनियर विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे, असे त्या म्हणाल्या.
या विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत, जसे की, तुमच्या घरातील प्रॉब्लेम किंवा कॉलेजमधील काही प्रॉब्लेम निवारणासाठी महाविद्यालयामध्ये 5 विद्यार्थ्यांमध्ये एका शिक्षकाची निवडही करण्यात आलेली आहे. शिक्षक विद्यार्थ्याची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधतील आणि यातून विद्यार्थ्यांच्या अडचणींचे समाधानही होईल, अशी व्यवस्थासुद्धा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी केली आहे.
या दोन्ही उपक्रमामुळे आमच्या महाविद्यालयामध्ये गेल्या चार वर्षापासून कोणतीही रॅगिंगची केसी आमच्याकडे आलेली नाही. सर्व विद्यार्थी हे मिळून मिसळून राहतात. एकमेकांना मदत करतात. कुठल्याही गोष्टीत अडचण येऊ देत नाहीत. आमचे सर्व शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना सर्व मदत करतात, असे अधिष्ठाता डॉ. माया इंदुरकर यांनी सांगितले.