छत्रपती संभाजीनगर : आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच यामुळे अनेक समस्या होत असतात. ज्या लोकांना कमी रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब असेल अशा व्यक्तींचा आहार हा चांगला असावा. म्हणून अशा लोकांनी नेमकं काय खावं किंवा काय खाऊ नये, हे जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
ज्या लोकांना कमी रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. अशा व्यक्तीने सर्वप्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच त्यानुसार औषधी घ्याव्या. सर्वप्रथम ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण हे योग्य असायला हवे आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज फक्त पाच ग्रॅम एवढेच मिठाचे सेवन करायला हवे. मिठामुळे रक्तदाबाचा त्रास हा वाढतो. त्यामुळे 5 ग्रॅमच्या वर मीठ हे खाता कामा नये. त्यानंतर दिवसभरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. 2 ते 3 लीटर किमान पाणी हे प्रत्येक व्यक्तीने प्यायलाचं हवं.
लठ्ठपणापासून ते हाय ब्लडप्रेशरपर्यंत, फूल एक फायदे अनेक, 22 आजारांवर फायदेशीर
रोजच्या जेवणामध्ये पालेभाज्या,कडधान्य, नट्स यांचा समावेश असावा. यामुळे तुम्हाला B12 हे व्हिटामिन मिळते. त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये दुध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे देखील रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. त्यासोबतच नाचणी, राजगिरा, स्प्राऊट, कडधान्य यांचाही आहारात समावेश करावा. त्यासोबतच नारळ पाणी, लिंबू पाणी, गाजराचा ज्यूस हेदेखील दररोज घ्यायला हवे.
त्यासोबतच ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे. अशा सर्वांनी कॉफी घ्यावी. कारण कॉफीमध्ये जे कॅफिन असतं ते रक्तदाब नियंत्रण आणायला मदत करते. त्यासोबतच डार्क चॉकलेटचा देखील आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यावा. यामुळेही रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. अशाप्रकारे आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित आहार घेतला तर तुमचा कमी रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात यायला मदत होईल.
Disclaimer : ही बातमी तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणतीही वस्तू, पदार्थ वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.