चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाने तिकिट दिलं आहे. तिकिट दोन - तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद होत नाही. ८ दिवसात संभाजीनगरचा प्रचार करणार आहे. उद्धव ठाकरेंचे हात मजबूत करण्यासाठी मी शिवसेनेतच लढणार आहे. खैरे आणि माझ्यात वाद नाही. नाराज असल्यावर पक्ष सोडतात का? असा प्रश्नही दानवे यांनी विचारला.
लोकसभेसाठी ही भूमिका आहे का? मी सर्व भूमिका मांडल्या आहेत. मी पुन्हा पुन्हा तेच सांगण्यात अर्थ नाही. एका चॅनेलचा फोन आला, एका चॅनेलने चुकीची बातमी लावली. मी मातोश्रीवर असताना चॅनेलकडून फोन आला त्यावर तुम्ही वर्षावर पोहोचले का? भाजप प्रवेश करणार का? असं विचारत होते. हे काय आहे असं म्हणत त्यांनी प्रश्न विचारला.
advertisement
उमेदवारी जाहीर होऊन पाच दिवस झाले. त्याच दिवशी नाराजी, राजी हा विषय संपला. पक्षप्रमुखांकडे मी जाऊन आलो. माझं त्याआधी बोलणं झालं होतं. शिस्त पाळणं गरजेचं असतं. मी शिवसैनिक आहे. शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. तिकिट मागणं गुन्हा नाही. मागितलं होतं. दोघांनी तिकिट मागितलं म्हणजे मतभेद आहे म्हणता येणार नाही. तसंच मला महायुतीकडून कोणतीही ऑफर नाही असंही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. मी भाजपात होतो आणि ABVP चं काम केलंय. पण मी 30 वर्षांपासून शिवसेनेत आहे असं दानवेंनी सांगितलं.