माहितीनुसार, शहर आणि परिसरातील 19 प्रस्तावांची पूर्तता सुरू असून ते लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. महाकुंभमेळ्याच्या काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे आणि टुरिझम व्हिला हे पर्यटकांसाठी पर्यायी निवासव्यवस्था म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
शेतकऱ्याचा लेक झाला अधिकारी, क्लासेसचा आधार न घेता मिळवलं यश, UPSC परीक्षेत 434 रँक, Video
advertisement
महाकुंभसाठी होमस्टे
पर्यटन संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार शहरातील विविध भागांत या सुविधा विकसित होत आहेत. दौलताबाद येथे एका टुरिझम व्हिलाला परवाना देण्यात आला आहे. तसेच बीड बायपास, नारेगाव (समृद्धी महामार्ग परिसर) आणि सिडको भागात मिळून सहा होमस्टेला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय बाबा पेट्रोल पंप परिसर व सिडको भागात टुरिझम अपार्टमेंट्सचा प्रस्ताव असून अन्य नऊ ठिकाणी व्हेकेशन होम्सचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
कसा करायचा अर्ज?
होमस्टे सुरू करण्यासाठी इच्छुक नागरिकांनी पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. त्यानंतर पर्यटन विभागाकडून संबंधित जागेची पाहणी केली जाते आणि सर्व नियमांची पूर्तता झाल्यानंतरच परवाना दिला जातो. या प्रक्रियेमुळे पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित होत असून स्थानिकांना अधिकृत व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होते
होमस्टेची नियमावली
होमस्टे योजनेसाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार किमान एक ते कमाल पाच खोल्या असणे आवश्यक आहे. घराचा 7/12 उतारा किंवा मालमत्ता कर भरल्याची पावती, घराचा अधिकृत नकाशा तसेच उपलब्ध खोल्यांचे फोटो अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. याशिवाय घरमालक व कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी, आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या प्रती तसेच संबंधित ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना-हरकत दाखला आवश्यक आहे. प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृह, स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा प्रकाश आणि योग्य वायुवीजन असणे अनिवार्य आहे.
टुरिझम व्हिला किंवा व्हेकेशन होम्ससाठीही काही नियम लागू करण्यात आले आहेत. या ठिकाणी खोल्यांची संख्या होमस्टेपेक्षा अधिक असू शकते. मात्र मालकी हक्काचा अधिकृत पुरावा, सक्षम प्राधिकाऱ्याची बांधकाम परवानगी व मंजूर नकाशा सादर करणे आवश्यक आहे. तसेच पोलिस पडताळणी, अग्निशमन विभागाचा दाखला, मालकाचे आधार आणि पॅन कार्डही सादर करावे लागते. प्रत्येक युनिटमध्ये स्वतंत्र शौचालय व स्नानगृह, 24 तास स्वच्छ पाणी व वीजपुरवठा, योग्य वायुवीजन, कचरा व्यवस्थापनाची सोय आणि पर्यटकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा असणे आवश्यक आहे.






