दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार आणि सध्या महाविकास आघाडीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता अंबादास दानवे यांची देखील नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे दोन नेते झाले आहेत.
अंबादास दानवे हे लोकसभेसाठी इच्छूक होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. चंद्रकांत खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर दानवे नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मी नाराज नसल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी त्यानंतर चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट देखील घेतली. त्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. मी कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं दानवे यांनी तेव्हा म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता दानवे यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement