आज 20 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह जोरदार पाऊस होईल.
advertisement
हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज सतर्कतेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. या ठिकाणी हवामानाची हीच स्थिती कायम राहणार असून आकाश ढगाळ राहील.
गेल्या काही दिवसांपासून मराठाड्यात पावसाने थैमान घातले आहे. बीड, परभणी, जालना, नांदेडसह सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पुन्हा पावसाचा अलर्ट असल्याने नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
पुढील काही दिवस मराठवाड्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा इशारा कायम आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत पावसाची तीव्रता कमी अधिक राहील.