स्वामी रामानंद तीर्थ हे मराठवाडा मुक्ती संग्रमाच्या लढ्याचे प्रमुख नेते होते. सन्यासी असलेल्या स्वामीजींनी अहिंसात्मक मार्गानं निजामाच्या विरुद्ध लढा उभारला. त्यांच्या या लढ्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये जागृती झाली. ते निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध पेटून उठले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधीजींच्या इतकं मराठवाड्याच्या मुक्ती लढ्यात स्वामीजींचं योगदान आहे.
शिवाजी महाराजांना शस्त्र पुरवणाऱ्या पुण्यातल्या गल्लीची सुरूय अस्तित्वाची लढाई, Ground Report
advertisement
स्वामीजींच्या आठवणी
स्वामीजींचे पुतणे डॉक्टर शिरीष खेडगीकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. व्यंकटेश भगवान खेडगीकर असं स्वामीजींचं पूर्ण नाव. कर्नाटकातील सिंदगीमध्ये त्यांचा जन्म झाला. 'स्वामीजी अंबेजोगाईध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये येत असतं. त्यावेळी मी स्वत: त्यांना डबा घेऊन जात असे. ते माझ्या अभ्यासाची आणि प्रगतीची चौकशी करत. स्वामीजींसोबत कायम वेगवेगळी पुस्तकं असतं. त्यांना सात भाषा येत होत्या. त्यांच्या प्रेरणेतूनच मी चौथीला स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आलो होतो, अशी आठवण त्यांनी सांगितली.
संपूर्ण दगडी बांधकामाचे आहे हे मंदिर; इंग्रजांच्या राजवटीबद्दल आढळते भविष्यवाणी!
स्वामीजी माझ्या आईला माई म्हणतं. आईनं त्यांच्या प्रेरणेतून अंबेजोगाईमध्ये पहिली कन्या शाळा सुरू केली. स्वामीजींनी त्यांच्या लढ्याला कधीही धार्मिक वळण दिलं नाही. महात्मा गांधीजींच्या विचारांच्या आधारावरच त्यांनी हा लढा दिला.मी आज जो काही आहे तो त्यांच्या आशिर्वादामुळेच आहे, असं खेडगीकर यांनी सांगितलं.





