शिवाजी महाराजांना शस्त्र पुरवणाऱ्या पुण्यातल्या गल्लीची सुरूय अस्तित्वाची लढाई, Ground Report
- Published by:News18 Marathi
Last Updated:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध असलेली 'ही' गल्ली सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे.
पुणे, 14 सप्टेंबर : पुणे शहरातल्या अनेक भागांना मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यातल्या कसबा पेठेच्या जवळच्या भागाला मोठा इतिहास आहे. या ऐतिहासिक भागात तांबट आळीचा समावेश आहे. शिवाजी महाराजांच्या काळात याच तांबट आळीत शस्त्र तयार केली जात असत. शहराच्या पूर्व भागात असलेल्या या गल्लीत ऐतिहासिक कला जोपासण्याचं काम आजही केलं जात आहे.
कसबा गणपती मंदिरासमोर उभं राहिलं तर डाव्या बाजूला जो रस्ता जातो त्या भागात आतमध्ये तांबट आळी आहे. या गल्लाीतल्या प्रत्येक छोट्या छोट्या घरात तांब्या पितळ्याची भांडी घडवायचं काम वर्षानुवर्षं चालू आहे. देवघरातील मूर्ती, ताटं, वाट्या, भांडी, शोभेच्या वस्तू, लहान मुलांची भातुकली, गृह सुशोभीकरणाचा अनंत वस्तू असा सर्व खजिना इथे बनतो.
advertisement
शिवाजी महाराजांच्या काळात या तांबट आळीतून शस्त्र तयार केली जात असत. त्यानंतर पेशवेकाळात ही मंडळी येथे तांबे-पितळ्यांची नाणी बनवत असत. मात्र नंतर भारतात ब्रिटीशांचे राज्य आले. ब्रिटिशांनी तांबट आळीतील हा व्यवसाय हाणून पाडला. त्यामुळे ९० टक्के तांब्याचा होणारा पुरवठा कमी झाला. तांब्याचा पुरवठाच कमी झाल्याने शस्त्रात्रे बनवणं येथील कारागिरांना कठीण बनलं. मात्र काहीतरी करून उदारनिर्वाह करणं गरजेच होतंच. शेवटी त्यांनी मिळणाऱ्या तांब्यापासून घरगुती भांडी तयार करणं सुरू केलं.
advertisement
तबक, स्वाग, रेनंद, तेजप, पत्री, खरवई, खोड, मोगरी, तावकाम, खोलण्या, लोखंडी उबाळा, लोखंडी आडी, दांडकं अशा विविध अवजारांचा वापर करून ही भांडी बनवली जातात.’ हा व्यवसाय हस्तकौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या व्यवसायाने परदेशी बाजारपेठेतही आपले बस्तान बसवलेले आहे.
advertisement
शंभर वर्षांपूर्वी या पुण्यामध्ये तांब्या पितळेची भांडी तयार करण्याचे कारखाने नव्हते, भांडी परगावाहून पुण्यात येत असत असं सांगण्यात येतं. मात्र कालांतराने पुण्यात प्रगती झाली. त्यामुळे पुण्यातही कारखाने उभे राहू लागले.सतत बदलत राहणे हा काळाचा गुणधर्म आहे. म्हणून काळाच्या प्रवाहाबरोबर जो राहतो तोच टिकतो. तांबट व्यवसायाचेही असेच झाले. तांबट व्यवसायातील कारागिरांनी आपल्या व्यवसायात आधुनिकता आणली नाही, परिणामी त्यांचा व्यवसाय आता लोप पावण्याच्या मार्गावर आहे.
advertisement
पुण्यात या प्रकारचे शंभरपेक्षा जास्त कारखाने होते, त्याच ठिकाणी आता केवळ 25 ते 30 कारखाने शिल्लक आहेत. काळाच्या प्रवाहाबरोबर जो राहतो तोच टिकतो. तांबट व्यवसायाचेही असेच झाले. तांबट व्यवसायातील कारागिरांनी आपल्या व्यवसायात आधुनिकता आणली नाही. त्यामुळे त्यांचा व्यवसाय आता लोप पावण्याच्या मार्गावर आहे. तांबट आळी म्हणजे पारंपरिक हस्तकलने तांब्याच्या टिकाऊ वस्तू तयार करणारे विश्व आता स्वतःच्या अस्तित्वाची लढाईच लढत आहेत.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 14, 2023 12:15 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
शिवाजी महाराजांना शस्त्र पुरवणाऱ्या पुण्यातल्या गल्लीची सुरूय अस्तित्वाची लढाई, Ground Report

