प्रेम, लग्न आणि 'धोखा'! मोनालिसाशी लग्नानंतर 5 दिवसांत दिसला फरमान खानचा वेगळाच चेहरा, VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
Monalisa Farman Video : मोनालिसाचा नवरा फरमान खानचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात त्याचं वेगळंच रूप पाहायला मिळतं आहे. फरमानचं हा व्हिडीओ पाहिल्यावर सगळे थक्क झाले आहेत.
कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने फरमान खानशी लग्न केलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. याला लव्ह जिहाद म्हणण्यात आलं. पण मोनालिसा आणि फरमान यांनी आपलं एकमेकांवर प्रेम करत असल्याचं सांगितलं. आम्ही धर्म बदलला नाही, हिंदू पद्धतीने लग्न केल्याचं ते म्हणाले. दरम्यान त्यांच्या लग्नाच्या 5 दिवसांत फरमान खानचा वेगळाच चेहरा आता पाहायला मिळाला आहे.
मोनालिसाचा नवरा फरमान खानचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात त्याचं वेगळंच रूप पाहायला मिळतं आहे. फरमानचं हा व्हिडीओ पाहिल्यावर सगळे थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे आणि त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता फरमान विस्कटलेले केस, फाटके कपडे, मोडलेला हात आणि पाय अशा अवस्थेत फरमान आहे. रस्त्यावर तो फिरतो आहे, एका खांबाला तो आपलं डोकं आपटतानाही दिसला, रस्त्यावर जे पडलेलं दिसलं तो तोंडात टाकून खाताना दिसला. एकंदर त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतं आहे.
व्हिडीओवर जर तुला वाटतं की मी असा होऊ नये, तर प्लीज मला धोखा देऊ नको, असं या व्हिडीओवर लिहिलं आहे. प्रेमात धोखा मिळाल्याने मानसिक संतुलन बिघडल्याचं या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
advertisement
फरमान खानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार फरमान खानचा हा व्हिडीओ जुना आहे. मीडिया रिपोर्टनुसार 4 नोव्हेंबर 2025 सालचा हा व्हिडीओ आहे, फरमानने प्रेमात धोखा मिळालेल्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलं, याचा अभिनय केला होता आणि ही रिल पोस्ट केली होती.
advertisement
advertisement
फरमान खानने आपण एक अभिनेता असल्याचं सांगितलं आहे. माहितीनुसार त्याने अनेक दाक्षिणात्य आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मोनालिसा-फरमानची लव्ह स्टोरी
फरमान आणि मोनालिसाच्या लग्नाची कथा एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. केरळमध्ये एका फिल्मच्या शूटिंगदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. प्रेमात पडल्यानंतर 6 महिन्यांत त्यांनी लग्न केलं. मोनालिसाने फरमानला लग्नाची मागणी घातली होती. फरमानने तिला नकार दिला होता. पण मोनालिसाच्या जिद्दीपुढे त्याने माघार घेतली. मोनालिसाने आपल्या घरचे जबरदस्ती आपलं लग्न दुसऱ्यासोबत लावून देत आहेत. जर तू मला वाचवलं नाहीस, तर मी 2-3 दिवसांत जीव देईन, अशी धमकी फरमानला दिला. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, याच भावनेतून फरमानने तिच्याशी लग्नाचा निर्णय घेतला.
advertisement
दरम्यान लव्ह जिहादच्या आरोपांवर सडेतोड उत्तर देत फरमान म्हणाला, "माझ्यासाठी सर्व धर्म समान आहेत. जर मला काही चुकीचं करायचं असतं, तर मी हिंदू पद्धतीने मंदिरात लग्न का केलं असतं? मोनालिसा तिचा हिंदू धर्मच पाळणार आहे आणि मी माझा मुसलमान धर्म." मोनालिसानेही याला दुजोरा दिला असून, तिने आपला धर्म बदललेला नसल्याचं स्पष्ट केलं.
Location :
Delhi
First Published :
Mar 15, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रेम, लग्न आणि 'धोखा'! मोनालिसाशी लग्नानंतर 5 दिवसांत दिसला फरमान खानचा वेगळाच चेहरा, VIDEO










