advertisement

पुणे हादरलं! पोह्यासाठी कांदा कापताना काम करण्यावरून वाद; मोठ्या भावानं धाकट्याच्या छातीत खुपसला धारदार चाकू

Last Updated:

रागाच्या भरात किशोरने हातात असलेला कांदा कापण्याचा चाकू दयानंदच्या डाव्या बरगडीवर खुपसला. या अचानक झालेल्या हल्ल्यात दयानंद गंभीर जखमी झाले

धाकट्या भावावर चाकूने हल्ला (प्रतिकात्मक फोटो)
धाकट्या भावावर चाकूने हल्ला (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि अजब घटना समोर आली आहे. यात चक्क भावानेच आपल्या लहान भावावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना चाकण परिसरात घडली आहे. 'तू काहीच काम करत नाहीस आणि दारू पितोस', असं म्हणत मोठ्या भावाने आधी वाद केला. यानंतर मोठ्या भावाने आपल्याच धाकट्या भावावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील शनिमंदिराच्या पाठीमागे ही घटना घडली. फिर्यादी दयानंद माणिक सावंत (वय २५) हे घरात असताना, त्यांचा मोठा भाऊ किशोर माणिक सावंत (वय ३०) हा पोहे बनवण्यासाठी कांदा चिरत होता. दरम्यान, दारू पिण्याच्या सवयीवरून आणि काम न करण्याच्या कारणावरून दोघा भावांत शाब्दिक चकमक उडाली.
advertisement
वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात किशोरने हातात असलेला कांदा कापण्याचा चाकू दयानंदच्या डाव्या बरगडीवर खुपसला. या अचानक झालेल्या हल्ल्यात दयानंद गंभीर जखमी झाले. जखमी दयानंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी किशोर सावंत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास अधिकारी बीएनएसएस कलम ३५ (३) नुसार आरोपीला नोटीस बजावून पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत. पोलीस हवालदार निघोट या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
advertisement
भावाच्या हातूनच झालेला हा हल्ला पाहून परिसरातून खळबळ उडाली असून, घरगुती वादातून होणारी हिंसा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! पोह्यासाठी कांदा कापताना काम करण्यावरून वाद; मोठ्या भावानं धाकट्याच्या छातीत खुपसला धारदार चाकू
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement