छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराचे खूप महत्त्व असते. या मानवी शरीराद्वारे विद्यार्थी त्यावर शिक्षण घेत असतात आणि त्यानंतरच प्रत्यक्ष रुग्णांवर इलाज करण्याचं काम हे विद्यार्थी करत असतात. देहदान कमी झाल्याने आता मानवी देह हे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कमी प्रमाणात भेटत आहेत. म्हणून यासाठी छत्रपती संभाजी नगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी स्किल लॅब सुरू करण्यात आली आहे.
advertisement
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी देह महत्त्वाचे ठरतात. यावरच विद्यार्थी सर्व अभ्यास करतात आणि अशाप्रकारे शिक्षण घेतात. मात्र, गेल्या काही काळापासून देहदान करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानवी देह हे अभ्यासासाठी पाहिजे तसे भेटत नाहीत आणि यामुळेच छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्किल लॅब सुरू करण्यात आली आहे.
नायब तहसिलदाराची मुलगी इथं शिकते, छ. संभाजीनगरमधील महानगरपालिकेची आदर्श शाळा, अशा आहेत सुविधा
स्किल लॅबमध्ये कृत्रिम मानवी देह ठेवण्यात आले आहेत. जशी मानवी शरीराची रचना असते, त्याचप्रमाणे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या या डमी बॉडीची रचना आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी शिकवण्यात येत आहेत. यामध्ये इंजेक्शन कसे द्यावे, सलाईन कशी लावावी, त्याचप्रमाणे सीपीआर कसा द्यायचा, यासोबतच प्रसूती कशी करावी या सर्व बाबी विद्यार्थ्यांना या डमी बॉडीवरती शिकवण्यात येत आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं खूप सोपं जाणार आहे.
'आला आला पावसाळा, पण आपली त्वचा सांभाळा', डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
ही स्किल लॅब सुरू झाल्याने आमच्या विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे. तसेच या ठिकाणी सर्व वर्षातील विद्यार्थी तसेच येथे जे रिसर्च करण्यासाठी आलेले विद्यार्थी आहेत, तेदेखील या ठिकाणी जाऊन सर्व गोष्टी माहिती घेऊन शिकू शकतात, अशी माहिती शरीररचना शास्त्र विभागाच्या डॉ. अर्चना कल्याणकर यांनी दिली.
ही स्किल लॅब मराठवाड्यातील पहिलीच लॅब आहे. घाटी रुग्णालयामध्ये ही लॅब सुरू झाली आहे. यामुळे याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.





