'आला आला पावसाळा, पण आपली त्वचा सांभाळा', डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, तुम्ही जर पावसातून भिजून आले असाल तर ओले कपडे अंगात न ठेवता ते कपडे काढावेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपली त्वचा पूर्ण कोरडी करावी.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. जसे आपण इतर ऋतूमध्ये आपल्या त्वचेची काळजी घेतो तसंच आपण पावसाळ्यामध्येही आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवी. यामुळे आपली त्वचा ही चांगली राहील आणि चेहऱ्यावर ग्लो होईल. म्हणून पावसाळ्यात कशा पद्धतीने त्वचेची काळी घ्यावी, याविषयी त्वचारोग तज्ञ डॉ. अनुपम टाकळकर यांनी सविस्तर अशी माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, तुम्ही जर पावसातून भिजून आले असाल तर ओले कपडे अंगात न ठेवता ते कपडे काढावेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपली त्वचा पूर्ण कोरडी करावी. त्यासोबतच पावसाळा जरी सुरू असला तरी दिवसभरात तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं. कारण पाणी प्यायल्याने आपली त्वचाही चांगली राहते. जशी आपण उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीम वापरतो त्यापद्धतीने आपण पावसाळ्यातही दररोज सनस्क्रीम लावायलाच पाहिजे.
advertisement
अंघोळ केल्यानंतर अंग नीट पुसून घ्यावे आणि त्यानंतर बॉडी लोशन आणि मॉइश्चरायझरचा वापर करावा. यामुळे तुमची त्वचा ही जास्त ड्राय किंवा ऑइली दिसणार नाही. सनस्क्रीम बॉडी लोशन, मॉइश्चरायझर लावणं, हे अत्यंत गरजेचं असतं. यामुळे आपली त्वचा चांगली राहते आणि ग्लो करते. अंघोळ करण्यासाठी अति गरम पाण्याचा वापर करू नये. थोडसं कोमटच पाणी घ्यायला हवं.
advertisement
जास्त गरम पाणी घेतल्याने आपली त्वचा खराब होण्याची शक्यता असते. यासोबतच आपला आहारही व्यवस्थित असायला हवा. व्हिटामिन सी, प्रोटीन या गोष्टींचा समावेश आपल्या आहारामध्ये करून घ्यावा. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेतली तर तुमची त्वचा ही चांगली राहील आणि ग्लोसुद्धा करेल, अशी माहित डॉ. अनुभव टाकळकर यांनी दिली.
advertisement
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
Jun 28, 2024 1:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
'आला आला पावसाळा, पण आपली त्वचा सांभाळा', डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती









