पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Last Updated:

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन हे मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यासोबत इतरही अनेक असे त्वचेचे आजारी होत असतात. त्यामुळे यावर नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत त्वचारोग तज्ञ डॉ. आसावरी टाकळकर यांनी माहिती दिली.

+
प्रतिकात्मक

प्रतिकात्मक फोटो

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू झाला की सर्वत्र थंडगार असं वातावरण असतं. पण पावसाळा सुरू झाला की, विविध प्रकारचे आजारही होण्याची शक्यता असते. यापैकीच एक म्हणजे फंगल इन्फेक्शन किंवा स्कीनचे आजार. पावसाळ्यात हे आजार मोठ्या प्रमाणात होतात. फंगल इन्फेक्शन हे मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यासोबत इतरही अनेक असे त्वचेचे आजारी होत असतात. त्यामुळे यावर नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत त्वचारोग तज्ञ डॉ. आसावरी टाकळकर यांनी माहिती दिली.
advertisement
लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाला की अनेक असे आजार होतातच. यामध्ये लहान मुलांनाही मोठे आजार हे होत असतात. पण सर्वात महत्त्वाचा आजार हा म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे. अर्थात गजकर्ण यामुळे खूप त्रास होत असतो.
देशभर त्यांचे भक्त, मोठमोठे मंत्रीही दरबारात लावतात हजेरी! कोण आहेत पंडित प्रदीप मिश्रा?
जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झाला असेल सर्वात आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जावं. त्यांच्याकडे जाऊनच त्यावर उपचार करावे. कोणताही घरगुती उपाय त्यावर करू नये. त्यासोबतच परस्पर कोणतीही क्रीम किंवा कोणताही मलम लावू नये. यामुळेही तुमचा हा आजार वाढू शकतो. बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन), गजकर्ण, चिखल्या हे आजार होत असतात.
advertisement
तर यावर उपाय म्हणजे तुम्ही सर्वप्रथम स्वच्छ आंघोळ करून घ्यावी. आंघोळ झाल्यानंतर आपले शरीर व्यवस्थितरित्या पुसून घ्यावं. कुठेही ओलं राहणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासोबतच रोज मॉइश्चरायजर लावावं. इतर कुठल्याही व्यक्तीचे कपडे किंवा टॉवेल याचा वापर करू नये. जर तुम्हाला जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं, तर त्वरित आपल्या जवळच्या त्वचारोग तज्ञांकडे जावं. त्यांना दाखवावे आणि त्यांच्या सल्ल्यानेच व्यवस्थितरित्या उपचार करून घ्यावे.
advertisement
AC खरेदी करण्याआधी आणि नंतर, या गोष्टी माहिती असणे गरजेचं, महत्त्वाचा सल्ला!
जर मधुमेह असेल तर अशा व्यक्तींनी अधिकच काळजी घ्यायला हवी. कारण, या व्यक्तींची जखमी लवकर पसरते आणि जखम बरी व्हायला अधिक वेळ लागतो. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये कोणतेही फंगल इन्फेक्शन होणार नाही आणि तुम्ही निरोगी राहाल, असा सल्ला त्वचारोगतज्ञ डॉ. असावरी टाकळकर यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement