दातांचे आजार होऊ नये, म्हणून काय घ्यावी काळजी; नुकसान टाळण्यासाठी ऑवर्जून फॉलो करा या टिप्स
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण आपल्या दातांची व्यवस्थितरित्या काळजी घ्यायला हवी. असे केल्याने तुम्हाला कोणताही प्रकारचे आजार होणार नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्यवस्थितरित्या ब्रश करायला पाहिजे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : अनेकांना दाताच्या समस्या असतात. दातांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. असं जर केलं तर यामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे तुम्हाला कॅन्सरसारखा आजारदेखील होऊ शकतो. त्यामुळे आपल्या दातांची आणि आपल्या तोंडाची कशाप्रकारे काळजी घ्यावी, काय टिप्स फॉलो कराव्यात, याविषयी डॉ. माया इंदुरकर यांनी संपूर्ण माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण आपल्या दातांची व्यवस्थितरित्या काळजी घ्यायला हवी. असे केल्याने तुम्हाला कोणताही प्रकारचे आजार होणार नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्यवस्थितरित्या ब्रश करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही मऊ अशा ब्रशचा आणि चांगल्या टूथपेस्ट वापर हा करायला हवा.
advertisement
अलका याग्निक यांचा आजार बरा होऊ शकतो, डॉक्टरने केला मोठा दावा, या थेरपीबद्दल सांगितलं...
तसेच किमान पाच मिनिटे तरी तुम्ही व्यवस्थितरित्या ब्रश करणे गरजेचे आहे. सकाळी आणि रात्री झोपण्याच्या अगोदर ब्रश हा करायलाच हवा. ब्रश केल्यामुळे तुमचे बरेच आजार हे कमी होतात आणि तुमचे दात आणि तुमच्या हिरड्या मजबूत होतात. त्यासोबतच दर 6 महिन्याला डॉक्टरांकडे जाऊन दाखवावे आणि सर्व दातांची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी.
advertisement
दातांमध्ये जर काही अडचण असेल किंवा कोणता आजार असेल तर त्यावर तुम्ही लगेच उपचार करायला हवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान हे टाळावं. सिगारेट, तंबाखू, दारू यांचा सेवन करू नये. यामुळेही तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच आहारही व्यवस्थित असायला हवा. आहारामध्ये पालेभाज्या, फळे, तसेच जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज या सर्व गोष्टींचा समावेश असायला हवा. जर तुमचा आहार व्यवस्थित असेल तर तुमचे दात, तुमच्या हिरड्या, तुमचा जबडा हा मजबूत होतो.
advertisement
अलका याज्ञिक सारखा आजार होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी?, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती..
त्यासोबतच जेवण केल्यानंतर लगेच कुठलाही चिकट किंवा गोड पदार्थ खाऊ नये आणि जर तुम्ही तो खाल्लास तर त्यानंतर व्यवस्थित गुळण्या करून तोंड स्वच्छ ठेवावा. हे उपाय तुम्ही जर केले तर तुमचे दात, तुमच्या हिरड्या, तुमचा जबडा आणि त्याचबरोबर तुमचा आरोग्यदेखील चांगला राहील, असा सल्ला डॉ. माया इंदुरकर यांनी दिला.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
June 27, 2024 12:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दातांचे आजार होऊ नये, म्हणून काय घ्यावी काळजी; नुकसान टाळण्यासाठी ऑवर्जून फॉलो करा या टिप्स