Indurikar Maharaj: आजकालच्या मुली..., इंदुरीकर महाराज पुन्हा तुफान बोलले; दिलं ओपन चॅलेंज, AUDIO व्हायरल
- Reported by:KUNDAN JADHAV
- Published by:Sachin S
Last Updated:
या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज यांनी आपल्या शैलीत कीर्तन केलं. यावेळी त्यांनी प्रेमात पळून जाणाऱ्या मुलींबद्दल वक्तव्य केलं.
अकोला : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज या ना त्या विधनामुळे कायम चर्चेत असतात. इंदुरीकर महाराज नेहमी कीर्तनामुळे केलेल्या वक्तव्यामुळे वादात अडकले आहे. महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराजांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. एवढंच नाहीतर मुलीच्या साखरपुड्याला केलेल्या खर्चावरूनही इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले होते. अशातच नव्या विधानामुळे इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहे. "आजकाल मुली दरिद्री मुलाच्याच प्रेमात पडतात, अशाच मुलासोबत पळून जातात, पळून गेलेल्या मुली जर सुखी झाल्या असेल तर दाखवा, मी तिच्या घरी धुणीभांडी घासेन, असं चॅलेंजचं महाराजांनी दिलं.
अकोल्यामध्ये इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज यांनी आपल्या शैलीत कीर्तन केलं. यावेळी त्यांनी तरुण पिढीचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी प्रेमात पळून जाणाऱ्या मुलींबद्दल वक्तव्य केलं. या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, या ऑडिओची न्यूज१८ मराठी पुष्टी करत नाहीत. पण, ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झााली आहे.
advertisement
काय म्हणाले इंदुरीकर महाराज?
"आजकाल मुली या हुशार मुलाच्या प्रेमात पडत नाही. नेहमी त्या दरिद्री मुलांना निवडतात. अशी पोरं विहिरीवर मोटरी, केबलच्या तार आणि गााड्यांचे पार्ट चोरणारे असतात. एखादी मुलगी जर दरिद्री पोरासोबत पळून गेली आणि ती आयुष्याात सुखी झाली असेल तर तर मला एकीने येऊन सांगावं, असं जर कुणी सापडलं तर पुढील 6 महिने मी तिच्या घरी धुणीभांडी घासेल, असं आव्हानचं इंदुरीकर महाराजांनी दिलं.
advertisement
मोबाईलवर बंदी घाला
परिक्षाच्या काळामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घातली पाहिजे. शाळा चालवणाऱ्या संस्थांनीही याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. कारण पोरं काही अभ्यास करत नाही. त्यांचं लक्ष मोबाईलमध्ये आहे. मग खिडकीतून चिठ्ठी दिल्या जाताात, मास्तरांना दम दिला जातो, आज ४० टक्के पोरांची अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नियामवली करून मोबाईलवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी इंदुरीकर महाराजांनी केली.
advertisement
'मोर्चे दंगलीच्या नादी लागू नका'
पोरांनो, मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका. आजकाल अशा मोर्चामध्ये पोलीस कॅमेरे घेऊन असतात. तुम्हाला सगळं काही करू देतात. पेनात कॅमेरा आला आहे. टपरी पेटवली, दंगलीत कुठे दिसले तर १० वर्षांची शिक्षा भोगावी लागते. पोलीस कलमं लावतात. आतापर्यंत दंगलीमध्ये गरिबांची पोरं आत गेली, मोठ्याचे कधी गेले नाही, कधी जाऊही देणारही नाहीत. ते फक्त तुमचा युज अँड थ्रो म्हणून वापरत करतात. आज कोणतंही काम करण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो, त्यामुळे पाया पडतो, दंगलीच्या भानगडीत पडू नका, असं आवाहनही इंदुरीकर महाराजांनी तरुणांना केलं.
Location :
Akola,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 7:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Indurikar Maharaj: आजकालच्या मुली..., इंदुरीकर महाराज पुन्हा तुफान बोलले; दिलं ओपन चॅलेंज, AUDIO व्हायरल







