छत्रपती संभाजीनगर : अवघी सहा वर्षाची असताना गीता ही रेल्वेमध्ये बसून चुकून पाकिस्तानात गेली होती. त्या ठिकाणी ती तब्बल 16 वर्ष राहिली. यानंतर 2015 गीता ही भारतात आली. भारताची माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी गीताला भारतात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. पण सध्या ही गीता कुठे आहे, काय करते, कुठे शिक्षण घेते, हे अनेकांना जाणून घ्यायची इच्छा असेल. याच पार्श्वभूमीवर लोकल18 च्या टीमने तिच्याशी विशेष संवाद साधला.
advertisement
अवघ्या सहा वर्षाची असताना गीता चुकून रेल्वेमध्ये बसून पाकिस्तानात गेली. त्या ठिकाणी ती तब्बल 16 वर्षे राहिली. तिथल्या एका सामाजिक संस्थेत गीता राहिली. गीता तिथे असताना तिला भारतात परत आणण्यासाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी प्रयत्न केले. त्यांच्या विशेष प्रयत्नानंतर गीता भारतात परतली.
गीता पंधारे ही मूळची परभणी जिल्ह्यातली आहे. ती सध्याला तिची आई मीना पंधारे सोबत छत्रपती संभाजीनगर शहरात राहते. तिची आई ही मोलमजुरी करते. तिच्या वडिलांचे निधन झालेलं आहे. गीता सध्या छञपती संभाजीनगर शहरातील प्रोग्रेसिव्ह लाईफ सेंटर या संस्थेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे. तिला भविष्यामध्ये शिक्षक व्हायचं आहे. जे मूकबधिर विद्यार्थी आहेत त्यांना तिला शिकवायचं आहे. गीतानं मध्यप्रदेश राज्य मुक्त विद्यालय शिक्षा बोर्डमध्ये आठवीपर्यंतचं शिक्षण घेतलं.
लोकल18 शी बोलताना गीता म्हणाली की, जेव्हा मी पाकिस्तानात होते त्याठिकाणी मला खूप माझ्या आई-वडिलांची आठवण येत होती. तिथलं वातावरण खूप वेगळं होतं. तिथे मला शिक्षणही घेता आले नाही. मी जेव्हा भारतात परतली तेव्हा खूप लोकांनी मला त्यांचा आई-वडीलांबद्दल सांगितले. तेव्हा मला खूप त्रास झाला. पण नंतर मला माझे आई-वडील भेटले आणि आता मी त्यांच्यासोबत आहे, याचा मला खूप आनंद आहे.
पारंपारिक लुकवर सुंदर दिसतील अशा पर्स, दादरमधील अनेकांच्या आवडीचं असं दुकान, हे आहे Location
लोकल18 शी बोलताना गीताने सुषमा स्वराज यांचे नाव खूपदा घेतले. ती म्हणते की मी जेव्हा परत आले तेव्हा त्यांना मी घट्ट मिठी मारली. कारण त्यांनी मला परत आपल्या देशामध्ये आणून मला माझ्या आई वडिलांकडे पाठवले. जेव्हा मला कळलं की, त्या आता या जगात राहिलेलं नाहीयेत तेव्हा मला खूप कमी वाईट वाटले आणि त्यांचे मी परत एकदा खूप आभार मानते.
जालना अग्निशामक दलात 4 अत्यंत स्पेशल अन् अत्याधुनिक बुलेट दाखल; जाणून घ्या, असं काय आहे यात विशेष?
गीताला वाचन करायला, खेळायला, त्याचबरोबर मैत्रिणींसोबत गप्पा मारायला, चित्र काढायला खूप आवडते. तिला भविष्यामध्ये संपूर्ण शिक्षण घेऊन जे मूकबधिर मुले आहेत, यासारखे त्यांना तिला शिकवायचं आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभ करायचा आहे, असे गीताने सांगितले आहे.