TRENDING:

Sambhajinagar: प्राध्यापक हत्याकांडात नवा ट्विस्ट, रीलस्टार महिलेनं हनिट्रॅपमध्ये अडकवलं? अनेक राजकीय नेत्यांसोबत VIDEO

Last Updated:

शनिवारी १४ मार्चला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हाय प्रोफाइल हत्याकांड उघडकीस आलं आहे. इथं एका निवृत्त प्राध्यापकाची दोन जणांनी निर्घृण हत्या केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: शनिवारी १४ मार्चला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हाय प्रोफाइल हत्याकांड उघडकीस आलं आहे. इथं एका निवृत्त प्राध्यापकाची दोन जणांनी निर्घृण हत्या केली आहे. राजाराम सुबराव लोंढे असं हत्या झालेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. आरोपी विशाल विकास राठोड आणि त्याचा मेहुणा आकाश विनोद पवार यांनी डोक्यात गोळी घालून लोंढेंची हत्या केली. आता या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. लोंढे यांना एका महिलेकडून हनिट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं होतं. त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं, अशी नवी माहिती आता समोर आली आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुबराव लोंढे हे मागील एक महिन्यांपासून बेपत्ता होते. बेपत्ता व्हायच्या आदल्या रात्री ते आरोपी रिलस्टार विशाल राठोडसोबत फार्महाऊसवर पार्टीला गेले होते. या ठिकाणी काही महिला देखील होत्या. मात्र इथं मद्य प्राशन केल्यानंतर विशाल राठोडने आपला मेहुणा आकाश पवारच्या मदतीने लोंढेंच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली. आरोपींनी राजाराम लोंढे यांच्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला. हत्या केल्यानंतर आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून लोंढे यांचा मृतदेह पुरून ठेवला होता.

advertisement

त्यामुळे लोंढे यांच्यासोबत नेमकं काय घडलं? याबाबत गूढ बनलं होतं. पोलीस सर्वत्र तपास करत होते, मात्र त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. आरोपी विशाल राठोड स्वत: लोंढेंच्या नातेवाईकांसोबत त्यांना शोधण्याचं नाटक करत होता. मागील महिनाभरापासून हा प्रकार सुरू होता. मात्र महिनाभरानंतर सिनेस्टाइल पद्धतीने केलेल्या हत्येचा उलगडा झाला. जवळपास ३० दिवस विशाल, आकाशने पोलिसांची दिशाभूल केली. मोबाइलच्या तांत्रिक तपासातही तो अडकत नव्हता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेडलाईट एरियातलं ‘ते’ दृश्य पाहिलं, केरळच्या लीला ईसोंना ठरवलं, नागपुरात मोठं काम, Video
सर्व पहा

मात्र सुरुवातीला पोलिसांनी नोंदवलेल्या १७जणांच्या जबाबांपैकी विशालची एक मैत्रीण आणि फार्महाउसवर पैसे विसरलेल्या एका महिलेच्या जबाबानंतर विशालच्या जबाबात तफावत आली. यानंतर शनिवारी लोंढे यांच्या हत्येचा धक्कादायकरीत्या उलगडा झाला. या संपूर्ण कटात एक महिलेचा हात असावा, असा संशय पोलिसांना आहे. ही महिला देखील रीलस्टार असून तिचे अनेक नेत्यांसोबत व्हिडीओ आहेत. पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar: प्राध्यापक हत्याकांडात नवा ट्विस्ट, रीलस्टार महिलेनं हनिट्रॅपमध्ये अडकवलं? अनेक राजकीय नेत्यांसोबत VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल