TRENDING:

साईबाबांचं दर्शन घ्यायचं अन् थेट बालाजीला जायचं, शिर्डी-तिरुपती नवी एक्स्प्रेस, थांबे आणि वेळापत्रक

Last Updated:

Shirdi Tirupati Express: महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील धार्मिक स्थळांना भेटी देणं आता सोपं होणार आहे. साईनगर शिर्डी ते तिरुपती नवीन एक्सप्रेस सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर: तिरुपती ते साईनगर शिर्डीसह महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणांना जोडणारी नवी साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी सुरू झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी नवी दिल्लीतील रेल भवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी धार्मिक पर्यटनाला चालना देणार असून महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणातील प्रवाशांना लाभ होईल. या गाडीचा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या परळी वैजनाथ येथील थांबाही विशेष ठरणार आहे.
साईबाबांचं दर्शन घ्यायचं अन् थेट बालाजीला जायचं, शिर्डी-तिरुपती नवी एक्स्प्रेस, थांबे आणि वेळापत्रक
साईबाबांचं दर्शन घ्यायचं अन् थेट बालाजीला जायचं, शिर्डी-तिरुपती नवी एक्स्प्रेस, थांबे आणि वेळापत्रक
advertisement

तिरुपती साईनगर शिर्डी ही ‎ही एक्स्प्रेस 9 डिसेंबरला पहिल्यांदा धावली असून 14 डिसेंबरपासून नियमित सेवा सुरू होत आहे. प्रत्येक रविवारी सकाळी 4 वाजता तिरुपतीहून सुटणारी गाडी सोमवारी सकाळी 6.15 वाजता छत्रपती संभाजीनगरला आणि सकाळी 10.45 वाजता शिर्डीला पोहोचेल. परतीचा प्रवास सोमवारी सायंकाळी 7.35 वाजता सुरू होईल आणि संभाजीनगरमार्गे रात्री 11.10 वाजता पुढे तिरुपतीकडे रवाना होईल. दक्षिणेकडून येणाऱ्या भाविकांना एकाच दिवसात साईदर्शन करून परत जाण्याचीही सोय यामुळे उपलब्ध झाली आहे. मात्र, इतर भागातील प्रवाशांसाठी अशी सोय उपलब्ध नाही.

advertisement

नाताळ, नववर्षासाठी मध्य रेल्वेचं गिफ्ट, मुंबई, पुण्यातून विदर्भासाठी 3 गाड्या, कुठून कुठं? पाहा वेळापत्रक

विशेष गाड्यांच्या तीन फेऱ्या रद्द

‎संभाजीनगरकरांसाठी साप्ताहिक गाडी कायमस्वरूपी दिल्याचा लाभ मिळाला असला, तरी त्याच्या बदल्यात दीर्घकाळ सुरू असलेल्या तिरुपती–शिर्डी विशेष गाड्यांच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 14, 21 आणि 28 डिसेंबरच्या विशेष सेवांना रद्द केल्यामुळे आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अनेकांनी प्रवासाची आखणी करूनही ट्रेन रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

advertisement

तिरुपती-साईनगर शिर्डी या गाडीला छत्रपती संभाजीनगरसह एकूण 31 थांबे असतील. यामध्ये नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाड हे महत्त्वाचे थांबे राहणार असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या परळी वैजनाथला देखील ही गाडी थांबेल. विशेष म्हणजे नवीन एक्स्प्रेसचे डिझाइन दक्षिण भारतातील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन करण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. शिर्डी, मनमाड आणि नगरसोल येथे मोठा कोटा राखण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगरला केवळ 40 ते 45 जागा मिळतील अशी माहिती मिळते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर स्थिर, कांद्यामध्ये पुन्हा घसरण, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

संभाजीनगरहून तिरुपतीकडे जाणारी गाडी उपलब्ध असली तरी, परतीचा मार्ग तितका सोयीस्कर नाही. भाविक शिर्डीला सकाळी 10 च्या सुमारास पोहोचतात; मात्र त्यांना परतीसाठी संध्याकाळी 7 वाजता उपलब्ध होणारी एकमेव गाडी पकडावी लागते. त्यामुळे वेळेचे बंधन आणि जागेची मर्यादा प्रवाशांसाठी अडचणीचे ठरणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
साईबाबांचं दर्शन घ्यायचं अन् थेट बालाजीला जायचं, शिर्डी-तिरुपती नवी एक्स्प्रेस, थांबे आणि वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल