छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर हे औद्योगिक शहर आहे. शहरालगत अनेक असे महामार्ग दिलेले आहेत. पण त्यापैकी सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग हा छत्रपती संभाजी नगर शहरातून गेलेला आहे आणि यामुळे सध्या या मार्गालगतच्या जमिनींना मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे. मात्र, नेमकं का या जमिनींना इतकी मागणी का आली आहे, याबाबत इस्टेट एजंट संदीप कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिली.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग हा गेला आहे. समृद्धी महामार्गालगतच्या ज्या जमिनी आहेत, त्या जमिनींना सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आली आहे. याची मुख्य कारण म्हणजे, हा सगळ्यात मोठा महामार्ग समजला जातो. याठिकाणी आता हळूहळू हॉटेल्स, रेस्टॉरंट किंवा इतर सोयी सुविधा या भविष्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे लोकांनी गुंतवणूक म्हणून समृद्धी लगतच्या ज्या जमिनी आहेत, त्या घ्यायला आता सुरुवात केलेली आहे.
Ganeshotsav 2024 : अजूनही अनेकांकडे बसतो अडीच किंवा तीन दिवसांचा बाप्पा, यामागचं कारण काय?
विशेष म्हणजे त्या ठिकाणी ज्या जमिनी आहेत, त्या जमिनींना खूप अशी मागणी आली असल्याचे ते म्हणाले. समृद्धी महामार्ग लगतच्या ज्या जमिनी आहेत, त्या जमिनीचे भाव हे कोटींच्या घरामध्ये आहेत. समृद्धी महामार्ग लगतच्या शेतीलाही खूप भाव आला आहे. प्रत्येक जमिनीचा भाव हे वेगवेगळे आहे. पण कोटीच्यावर जमिनींना भाव वाढला आहे.
कोकणात गौरी गणपतीच्या काळात बनवले जातात खमंग गव्हाच्या पिठाचे मोदक, अशी आहे सोपी रेसिपी
भविष्यामध्ये या जमिनींचे भाव अजून वाढण्याची शक्यता सांगितली जात आहे. जसा जसा या ठिकाणी अजून विकास होत जाईल, तसतसा या ठिकाणच्या जमिनीला मागणी येईल, असे इस्टेट एजंट संदीप कुलकर्णी यांनी सांगितले.