घरासमोरील परिसरात तुम्ही अरेलिया, अबोली, पेटूनिया, सदाफुली अशा विविध प्रकारची झाडे लावू शकता. यातील काही झाडांची फुले देवाची पूजा करण्यासाठी देखील वाहिली जातात. याची मोठ्या प्रमाणात मागणीही ग्राहकांकडून केली जाते. याबरोबरच हँगिंग प्लांटमधील काही झाडे बाहेर लावली जातात असे छत्रपती संभाजीनगर येथील पल्लवांकुर नर्सरी संचालक मधुकर वैद्य यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
Wheat or Jowar: ज्वारीची भाकरी की गव्हाची चपाती? उत्तम आरोग्यासाठी काय खावं?
हँगिंग प्लांट यामध्ये मनी प्लांट आहे. खाली कुंड्यांमध्ये लावण्यासाठी आणि वर हँगिंग लावण्यासाठी असे दोन प्रकार याचे पडतात. तसेच पाम झाडाच्या दहा व्हरायटी आहेत पाम झाडे सौंदर्यीकरण मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे घरासमोर लावण्यासाठी वापर केला जातो. याबरोबरच कडुलिंब, पुदिना, क्रोटॉन, ही झाडे घराला शोभा देतात, तसेच आपल्याला ऑक्सिजन देण्याचे काम देखील करतात.
इनडोअर प्लांटमधील झाडांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारणपणे ही मोठी होत नसतात, इनडोअर एका विशिष्ट प्रमाणात असल्यामुळे त्याला मागणी असते. या सर्व झाडांची किंमत त्यांच्या उंचीनुसार आणि वयोमानानुसार ठरवली जाते सर्वसाधारणपणे 20 रुपयांपासून तुळस मिळते, तसेच विविध प्रजातींच्या झाडांनुसार त्यांची वेगवेगळी किंमत असते, असे देखील वैद्य यांनी सांगितले आहे.