छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या एसटी महामंडळामध्ये नवीन ई शिवाई बसेस दाखल झाल्या आहेत. अतिशय आनंददायी आणि प्रवासासाठी छान अशा या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्याला या ई बसेस संभाजीनगर ते पुणे आणि संभाजीनगर ते पैठण या मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत.
त्यासोबतच एसटी महामंडळात अजून काही मार्गांवर या बसेस सुरू करण्यात येणार आहेत. या बसेसमध्ये प्रवास केल्याने वेळही वाचतो. याबाबत विभागीय वाहतूक नियंत्रक पंडित चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, एसटी महामंडळाने सुरू केलेल्या ई-बस सेवेमुळे पैठण आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुमारे 20 ते 30 मिनिटांची बचत होत आहे. त्याचबरोबर या बसचा आवाज होत नाही. बसमधून धूर येत नाही. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होते. जालना, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर मार्गावरही या बसेस धावत आहेत.
जुन्या बसने मध्यवर्ती स्थानकातून पैठणला जाण्यासाठी सव्वा ते दीड तास लागतो. ई-बस सेवा सुरू झाल्यामुळे 55 मिनिटे ते 1 तास लागतात. पुण्याला जुनी बस 6 तासांत पोहोचते. ई-बस पाच ते साडेपाच तासातच पोहोचेल. जुन्या बसचा आवाज खूप होतो. बसमधून काळा धूर मोठ्या प्रमाणात सोडला जातो. नव्या बसचा आवाज होत नाही.
मुबंईतील नोकरी परवडेना, आज गावी दिवसाला कमावतोय 7 ते 8 हजार रुपये नफा, तरुणानं करुन दाखवलं!, VIDEO
या बस पर्यावरणपूरक आहेत. आसन क्षमता कमी केली आहे. त्यामुळे बस लवकर भरतात. बसमध्ये आरामदायी आसने, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. महिला प्रवाशांना 50 टक्के सवलत, ज्येष्ठांना भाडे सवलत देण्यात आली आहे.
सकाळी मध्यवर्ती बस स्थानकातून 6, 7, 8, 9, 10, आणि 11 अशी या बसची वेळ आहे. त्यानंतर संध्याकाळी 4, 5, 6, 7, 8 या वेळेमध्ये ही बस संभाजीनगरच्या बस स्थानकमधून पुण्याकडे रवाना होतात, अशा पद्धतीने या बसेच वेळापत्रक असेल, असे विभागीय वाहतूक नियंत्रण यांनी सांगितले आहे.