TRENDING:

Police Bharti 2025: पोलीस भरतीसंदर्भात GR आला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Last Updated:

Devendra Fadanvis: महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरतीस हिरवा कंदील दर्शविण्यात आलेला असून १५ हजार ६३१ पद भरतीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. एक जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे भरण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
advertisement

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे तसेच १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबविण्याच्या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबतचा प्रस्ताव १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला, त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

advertisement

शासन कोणती पदे भरणार?

अनुक्रमांक पदनाम रिक्त पदांची संख्या
पोलीस शिपाई १२,३९९
पोलीस शिपाई, चालक  २३४
बॅण्डस्मन २५
सशत्र पोलीस शिपाई २,३९३
कारागृह शिपाई ५८०
एकूण १५,६३१

advertisement

१५ हजार ६३१ रिक्त पदे भरणार

वित्त विभागाच्या संशासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद १५,६३१ रिक्त पदे (१०० टक्के) भरण्यास वित्त विभागाच्या शासन निर्णयातील तरतूदींमधून सूट देण्यात येत आहे.

advertisement

पोलीस शिपाई भरती सन २०२४-२५, OMR आधारीत लेखी परीक्षा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दररोजच्या जेवणात तिच भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा दहीतडका, रेसिपीचा Video
सर्व पहा

सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ आणि २१ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन २०२४-२५ ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास तसेच OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Police Bharti 2025: पोलीस भरतीसंदर्भात GR आला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल