महायुतीच्या नेत्याची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत महायुतीने दोन वर्षात केलेल्या कामांचं रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आलं. तसंच विरोधकांच्या आरोपांनाही तिन्ही नेत्यांनी उत्तरे दिली. यावेळी अमित शाह यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारण्यात आलं. तुमच्यासाठी आम्ही त्याग केला असं अमित शाह म्हणाले का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही त्या बैठकीत होता का? अरे बाबा, असं कुठंही, काहीही, कुणीही बोललंही नाही आणि आम्ही ऐकलंही नाही.
advertisement
Maharashtra Elections : पत्र लिहून सरकारवर नाराजी व्यक्त, अन् आता महायुतीचा आमदार नॉट रिचेबल
देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमच्याशिवाय दुसरा कुणी नव्हता. तरी तुम्ही त्याच्यावर बातम्या करताय. शंभर टक्के असं काही घडलं नाही. देवेंद्र फडणवीस असं बोलत असताना अजित पवार यांनी ही टेबल न्यूज आहे असं म्हटलं.
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात, ही कार्यकर्त्यांची भावना
बावनकुळे यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांच्याशी अमित शाह काय बोलले माहिती नाही. पण कार्यकर्त्यांची भावना आहे की ११३ आमदारांच्या पक्षाचा नेता उपमुख्यमंत्री आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत तर सरकारने जास्ती जास्त झुकतं माप मोठ्या पक्षाला द्यायला हवं. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी जागावाटपात जास्त आग्रह नाही पण सर्वजण जिंकण्यासाठी प्रयत्न करू. जिथं जिंकू शकतो तिथं युतीत काम करू.
