लहान मुलांना खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या या सिरपमुळे मध्यप्रदेशात 20 हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरात संताप व्यक्त झाला आहे.त्यानंतर शासनाने या सिरपवर तात्काळ बंदी आणली होती. मात्र तरीही बीडमध्ये या बंदी घातलेल्या सिरपच्या 500 बाटल्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यातील एका वितरकाकडून बीडमधील दोन एजन्सींना या सिरपचा पुरवठा झाला असून, त्या एजन्सीकडून बीड शहर, आष्टी, परळी आणि गेवराई येथील मेडिकलपर्यंत तो पोहोचल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने तपास सुरू केला असून सर्व साठा मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अहमदाबाद येथील स्मार्टवे वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या या सिरपमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
बीड शहर व तालुक्यात सर्वाधिक पुरवठा
बीड शहर व तालुक्यात 177, गेवराई तालुक्यात 166, परळी तालुक्यात 72 व आष्टी तालुक्यात 18 बाटल्यांचा पुरवठा झाला आहे. यातील काही बाटल्यांची विक्रीही झाली आहे. मात्र दोष सापडलेली बॅच व जिल्ह्यात असलेली बेंच ही वेगवेगळी आहे.अद्याप तरी जिल्ह्यात यामुळे कुणाला त्रास झाल्याची तक्रार नाही. पण अन्न व औषध प्रशासन विभागाने यात 500 बाटल्या जप्त केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने स्थानिक औषध पुरवठादार आणि वितरकांविरूद्ध चौकशी सुरू केली आहे.