काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्र समिती असे कितीतरी पक्ष फिरून आलेले आमदार चरण वाघमारे यांची राजकीय भूमिका कधीच स्थिर नसते आणि निष्ठा सतत बदलत असते, हे आता पर्यंत कित्येक वेळा सिद्ध झाले आहे. आता त्याच चरण वाघमारे यांना राशपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. कितीतरी पक्ष बदलून आलेले आणि प्रत्येक वेळी आपल्या पक्षाशी विसंगत भूमिका घेणारे चरण वाघमारे म्हणतात की मला शरद पवार साहेबांनी स्वतः आग्रह करून पक्षात घेतले आणि तिकीट दिले आहे.
advertisement
या मागे सत्य काय आणि असे करण्यामागे काय कारण होते, असा प्रश्न आता भंडारा जिल्ह्यातील राशप आणि काँग्रेस कार्यकर्तेच विचारत आहेत. चरण वाघमारे यांना तुमसर येथून महा विकास आघाडीचे तिकीट दिल्यास आम्ही त्यांचे काम करण्यापेक्षा घरी बसणे पसंत करू, असे आघाडीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उघडपणे म्हणत आहेत.
विदर्भातील महाराष्ट्र विकास आघाडीचे काही महत्त्वाचे नेते या पत्र परिषदेला संबोधित करतील. महा विकास आघाडीचे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नेते तसेच वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित राहतील.
पत्र परिषदेत माजी आमदार अनिल बावनकर, माजी खासदार शिशुपाल पटले ,राष्टवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी, जिल्हा परिषद भंडारा चे सभापती रमेश पारधी, पंचायत समिती चे माजी सभापती कलाम शेख, जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे, कांग्रेस चे जेष्ठ नेते तुमसर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, जिल्हा परिषद सदस्य, कृष्णकांत बघेल, प्रमोद तितिरमारे,बाळा ठाकुर, गजानन झंझाड,उमेश्वर कटरे, प्रमोद कटरे, कान्हा बावनकर, विजय शहारे, राजेश हटवार, चैन मसरके, प्रफुल्ल बिसने, यांच्यासहित अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील.
