पुणे कॅन्टॉन्मेंटमधून माजी मंत्री रमेश बागवे यांना अखेर उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना यावेळी काँग्रेस पक्ष उमेदवारी नाकारू शकतो, अशा बातम्या येत होत्या. मात्र पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
दुसरीकडे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दत्ता बहिरट यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. गेल्यावेळी भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांना पराभूत केले होते. यंदा शिवाजीनगरमधून काँग्रेसचे सनी निम्हण इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला.
advertisement
काँग्रेसची यादी
महाविकास आघाडीचं जागावाटप
महाविकासआघाडीमध्ये काँग्रेसने आतापर्यंत सर्वाधिक 99 उमेदवार घोषित केले आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 83 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 77 उमेदवारांची घोषणा केली आहे, त्यामुळे महाविकासआघाडीच्या 259 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत, तर अजूनही 29 जागांची घोषणा होणं बाकी आहे.
