तुळजापुरमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही गटाच्या वादामुळे रस्त्यावरील ट्राफिक दोन तासापासून जाम होते. रस्त्यावर प्रचंड नागरिकांची व बघ्यांची गर्दी आहे. धाराशिव व सोलापूर कडे जाणारा रस्ता ब्लॉक झाला आहे. निकालापूर्वीच दोन्ही गटात भांडण झाल्याने तुळजापुरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मध्यस्तीनंतर हा वाद मिटला होता. त्यानंतर काही वेळातच कोयत्याने वार झाल्याने हा वाद चिघळल्याचे पाहायला मिळाले.
advertisement
नातेवाईकावर कोयत्याने वार
महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांच्या नातेवाईकावर कोयत्याने वार करण्यात आले. वार केल्याने कुलदीप मगर गंभीर जखमी झाले असून त्यांना सोलापूरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. रस्त्याच्या कामावरून भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगणे आणि महाविविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात वाद झाला होता.
वादाचे रूपांतर हाणामारीत
किरकोळ कारणांवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. भांडण मिटवल्यानंतर कुलदीप मगर वर पिटू गंगेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे जमावाने मगर यांच्या घराबाहेर हवेत गोळीबार केल्याचे देखील समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात जमाव पांगवला आहे.
रस्त्यावरच जोरदार धक्काबुक्की
विशेष म्हणजे, निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच दोन गटांत असा हिंसक संघर्ष झाल्याने शहरात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या वादात दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. पाहता पाहता परिस्थिती चिघळली आणि रस्त्यावरच जोरदार धक्काबुक्की आणि मारहाण सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि बघ्यांची गर्दी जमली. या गोंधळामुळे धाराशिव आणि सोलापूरकडे जाणारा मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. यामुळे वातावरण चिघळले आहे.
हे ही वाचा :
