दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात आजच जाणार आहेत. माणिकराव कोकाटे दोषी आहेत. त्यामुळं त्यांची आमदारकी जाणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे हीच आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे. कोकाटे यांचे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगित देण्याची करणार मागणी करण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोकाटेंच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दोन वर्षांच्या शिक्षेवर स्थगित नसल्याने कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे. त्यामुळेच आता उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच माणिकराव कोकाटे हे सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे. शिक्षा केवळ दोन वर्षांची असल्याने केवळ शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देत उच्च न्यायालयाने कोकाटेंना जामीन मंजूर केला आहे
advertisement
आमदारकी रद्द होण्याची चिन्हे
लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ८ (३)अन्वये न्यायालयाकडून कोणत्याही गुन्ह्यासाठी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा ठोठावण्यात आल्यास आमदारकी रद्द होते. उच्च न्यायालयाने कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांची आमदारकी रद्द होण्याची दाट शक्यता आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेची घोषणा केली जाते. परंतु, कोकाटे हे उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
